मुंबई : 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'जुडवा- २' या चित्रपटांच्या तुफान यशामुळे  वरुण धवन सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या या आनंदात अजून एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे वरुण धवनला जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्राहलयात स्थान मिळणार आहे. लवकरच त्याचा पुतळा या संग्रहालयात उभारण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुतळ्याचे अनावरण पुढच्या वर्षी होणार आहे. मादाम तुसाँ म्युझियमच्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती देण्यात आली. वरुण धवननं लगेचच हे ट्विट रिट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. 'माझ्यासाठी हा खूप आंनदाचा क्षण आहे, तिथं जाऊन माझा पुतळा बघण्यास मी खुप उत्सुक आहे. धन्यवाद,' असं त्यानं म्हटलं आहे. या पुतळ्यासाठी माप देतानाचे फोटो पोस्ट करून 'लवकरच मादाम तुसाँमध्ये येत आहे' असंही त्यानं फोटोखाली म्हटलं आहे.



या सन्मानाबद्दल निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं वरुणचं अभिनंदन केलं आहे. 'ओळखा बर मादाम तुसाँमध्ये कोण येतंय? लवकरच मादाम तुसामध्ये येतोय वरुण धवन,' असे करणने ट्विटमध्ये म्हटलं आहे.