नवी दिल्ली : दिल्लीच्या मॅडम तुसाद म्युझियमध्ये आता प्रसिद्ध अभिनेत्री मधूबाला यांचा देखील पुतळा उभारण्यात आला आहे. 

भारतीय सिनेसृष्टीच्या क्लासिकल काळातील अभिनेत्रींपैकी मधूबाला ही पहिलीच अभिनेत्री आहे.

 

सहज सुंदर अभिनय आणि मोहक सौंदर्य  यांचा मिलाफ म्हणजे मधूबाला होत्या.  दिल्लीच्या मॅडम तुसाद म्युझियममध्ये 'मुघले आजम' चित्रपटात  मधूबाला यांनी साकारलेली ' अनारकली' या भूमिकेच्या स्वरूपात मधूबालांचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे. 


 

 

 

मधूबालांचे सौंदर्य  भारतीयांप्रमाणेच जगभरातील रसिकांवर जादू करणारं होते. त्यामुळेच 1952  साली ' थिएटर्स आर्ट्स' या मासिकाच्या कव्हरवर झळकण्याची संधी मिळाली होती.  

 

 

' हा मधूबालाचा पुतळा नव्हे तर साक्षात 'आपा' समोर आहेत असा भास होतोय.  त्यांना पाहून आता ती आपल्याशी बोलणार असं वाटतंय ' या शब्दांत मधूबालांची बहीण मधूर भूषण यांनी आपल्या भावना  'इंडिया डॉट कॉम' शी बोलताना व्यक्त केल्या.

 

मधूबालांनी 1942 साली 'बसंत' या चित्रपटाच्या माध्यमातून आणि 'बेबी मुमताज' या नावाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.  त्यांच्या अभिनयाने प्रभावित देविका रानी यांनी त्यांचे नामकरण ' मधूबाला' केले.