मुंबई : सिनेसृष्टीत कलाकारांच्या जोड्या या नेहमीच चर्चेचा विषय असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक जोडी गेली २३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही जोडी कुणी एक अभिनेता किंवा एक अभिनेत्री अशी नाही. तर ही जोडी आहे हसतमुख असणाऱ्या दोन अभिनेत्रींचा.... आठवलं ना?



'हम आपके हैं कौन' या सिनेमातून आपल्या अभिनयाची प्रेक्षकांना भूरळ पाडणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. तब्बल २३ वर्षांनी या दोन्ही अभिनेत्री एका आगामी मराठी सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. तेजस विजय देवसकर या सिनेमाचं दिग्दर्शक करणार असून या सिनेमाचं नावं काय असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही. माधुरीचा हा आतापर्यंतच्या प्रवासातला पहिला मराठी चित्रपट असल्याचंही त्यांनी सांगितलं.


या चित्रपटात माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, मात्र रेणुका आणि माधुरी या दोघी ‘हम आपके है कौन’ प्रमाणे बहिणी दाखवलेल्या नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. रेणुका आणि माधुरीची याआधीही 'झलक दिखला जा' ४ या डान्स रियलिटी शोमध्ये भेट झाली होती. त्यावेळी रेणूका शहाणे स्पर्धक होत्या. तर माधुरी परीक्षक होती. त्यामुळेच आता पुन्हा एकदा माधुरीसोबत काम करायला मिळणार म्हणून खूप उत्सूक असल्याचं रेणूका यांनी म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी तेजस आणि माझी एका डॉक्युमेंट्री फिल्मच्या निमित्ताने भेट झाली होती.


मात्र काही कारणाने त्याच्यावर पुढे काही काम झालं नाही. पण तरीही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. अचानक एक दिवस तेजस एक चित्रपट घेऊन त्यांच्याकडे गेला. त्याचवेळी त्याने माधुरी या चित्रपटात मुख्यभूमिका साकारणार असल्याचं सांगितलं. माधुरीने मराठी चित्रपटात काम करावं ही खूप दिवसांपासूनची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच हा अत्यंत चांगला विषय असल्याचंही रेणुका यांनी सांगितलं.