Madhuri Dixit Husband Shriram Nene Trolled: बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) पती आणि डॉक्टर श्रीराम नेने (Shriram Nene) हे नेहमीच तिच्यासोबच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात दिसतात. त्यांचा फीटनेस देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आता श्रीराम नेने एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. श्रीराम नेने यांनी काल गूड फ्रायडे निमित्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. (Madhuri Dixit Husband Shriram Nene) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ नेने यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नेटकऱ्यांनी गुड फ्रायडे निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये श्रीराम नेने म्हणाली 'जे साजरा करतात त्यांना हॅप्पी गुड फ्राइडे'. डॉ नेने यांनी हे ट्वीट केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले. त्याचे कारण म्हणजे ख्रिश्चन लोक हा दिवस शोक म्हणून पाहतात. कारण या दिवशी येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आले आणि म्हणून त्याची आठवण म्हणून हा दिवस गूड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. हे पाहता डॉ नेने यांनी या दिवसाला ‘हॅप्पी’ म्हटल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 



डॉ नेने यांचे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'गूड फ्रायडे कोण साजरा करत? हा दिवस प्रार्थना आणि शोक करण्यासाठी आहे. साजरा करण्यासाठी नाही. असं काही ट्वीट करण्याआधी, जनरल अवेअरनेस वाढण्यासाठी काही करत रहा.' दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मला असं वाटतं की तुम्हाला ही गोष्ट माहित हवी की हा दिवस आपण साजरा का करतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'गूड फ्रायडे या दिवशी प्रभु येशूला सुळावर चढवले होते, म्हणून त्याचा शोक करण्यात येतो. हा साजरा करण्यासाठी नाही तर एक पवित्र दिवस आहे. यात आनंदी असण्यासाठी काहीही नाही. ' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ते साजरा करत नाहीत सर'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'नेने के देने पड गये, सरांना ही ट्वीट करून पश्चाताप होत असेल.' 





हेही वाचा : Allu Arjun Birthday Special : 100 कोटींचं घर आणि 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन, अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती किती माहितीये का?






दरम्यान, श्रीराम नेने हे पहिले नाहीत ज्यांनी ही चूक केली आहे. याआधी माजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी देखील असचं केलं होतं. 2016 साली त्यांनी सगळ्यांना गूड फ्रायडेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांची अनेकांनी खिल्ली उडवली होती. दरम्यान, आजही असे बरेच लोक आहेत. ज्यांना गूड फ्रायडेचा खरा अर्थ माहित नाही.