Allu Arjun Birthday Special : 100 कोटींचं घर आणि 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन, अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती किती माहितीये का?

Allu Arjun Birthday Special : 'पुष्पा' (Pushpa) फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अल्लू अर्जुननं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण तुम्हाला माहितीये का पुष्पा या चित्रपटाआधीच अल्लु अर्जुन हा नॉर्थमध्ये एक लोकप्रिय स्टार आहे. प्रेक्षक त्याचे चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहायचे. अल्लू अर्जुनचा आज 8 एप्रिल रोजी 41 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

| Apr 08, 2023, 12:46 PM IST
1/8

Allu Arjun Birthday Special

अल्लू अर्जुनचा जन्म हा चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या कुटुंबात झाला होता. त्याचे आजोबा हे अल्लू रामलिंगैया हे होमोपैथिक डॉक्यर आणि स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये कामही केले होते. तर अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद हे तेलुगु चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते आणि डिस्ट्रीब्यूटर आहेत. 

2/8

Allu Arjun Birthday Special

अल्लू अर्जुनच्या वडिलांची 'गीता आर्ट्स' नावाची एक प्रोडक्शन कंपनी आहे. याशिवाय त्यांचा एक स्टुडियो असून त्याचं नाव 'अल्लू स्टूडियो' असं आहे. 'अल्लू एंटरटेनमेंट' नावाची त्यांची एक प्रोडक्शन कंपनी आहे. तर मेगा स्टार चिरंजीवी हे अल्लू अर्जुच्या आत्याचे पती आहेत. त्याप्रमाणे राम चरण हा अल्लू अर्जुनचा आतेभाऊ आहे. 

3/8

Allu Arjun Birthday Special

अल्लू अर्जुन 3 वर्षांचा असताना त्यानं विजेता या चित्रपटातून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर 2003 साली प्रदर्शित झालेल्या गंगोत्री या चित्रपटातून अल्लू अर्जुननं मुख्य भूमिकेत पदार्पण केलं. पहिला चित्रपट मिळण्याआधी अल्लू अर्जुननं जवळपास सहा महिने एनिमेटर आणि डिझायनर म्हणून काम केलं होतं. त्यावेळी त्याला 3500 रुपये महिन्याचा पगार मिळत होता. 

4/8

Allu Arjun Birthday Special

अल्लू अर्जुनला 'आर्या' या चित्रपटातून फेम मिळालं होतं. हा चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला होता. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांना या चित्रपटात रवि तेजा किंवा प्रभासला कास्ट करायचे होते. पण त्यांच्या हातात काही प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांनी चित्रपटाला नकार दिला आणि त्यानंतर ही संधी अल्लू अर्जुनला मिळाली. या चित्रपटाचा 2  पार्ट देखील प्रदर्शित झाला होता. 

5/8

Allu Arjun Birthday Special

अल्लू अर्जुननं 2011 साली गर्लफ्रेंड स्नेहाशी लग्न केलं. स्नेहाचे वडील बिझनेसमॅन होते. मुलीनं एका अभिनेत्यासोबत लग्न करायला नको अशी त्यांची इच्छा होती. मात्र, अखेर ते देखील या लग्नासाठी तयार झाले. तर अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांच्या लग्नात 100 कोटींचा खर्च झाल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. दरम्यान, फोटोग्राफ जोसेफनं एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांच्यालग्नात जवळपास 40 फोटोग्राफर्स होते.   

6/8

Allu Arjun Birthday Special

अल्लू अर्जुन लक्झरीयस लाइफस्टाइल जगतो. एका चित्रपटासाठी अल्लु अर्जुन 10 कोटी रुपये मानधन घेतो असे म्हटले जाते. त्याची महिन्याची कमाई ही 3 कोटी आहे. एका ब्रॅंडच्या एन्डॉर्समेंटसाठी अल्लू अर्जुन हा 3 कोटी रुपये मानधन घेतो. दरम्यान, अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ही 360 कोटी असल्याचे म्हटले जाते. 

7/8

Allu Arjun Birthday Special

हैदराबादमध्ये असलेल्या अल्लू अर्जुनच्या घराची किंमत ही 100 कोटीपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातं. त्याचं हे घर जुबली हिल्स येथे स्थित आहे. त्याच्या घराचं इंटिरिअर हे डिझायनर आमिर आणि हामिदा यांनी केले आहे. त्यांच्या घरात सगळ्या सुख सुविधा आहेत. 

8/8

Allu Arjun Birthday Special

अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ही 7 कोटी असल्याचे म्हटले जाते. त्याच्या या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सगळ्या सुख-सुविधा आहेत. तर फक्त व्हॅनिटीच्या इंटेरिअरवर अल्लू अर्जुननं 3 कोटी रुपये खर्च केले. तर अल्लू अर्जुनकडे अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन सुद्धा आहे. (All Photo Credit : Allu Arjun Instagram)