मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील स्कार्फ यातील वेगळंपण आहे. हा स्कार्फ माधुरीसाठी खास आहे कारण तिच्या 85 वर्षाच्या आईने हा स्कार्फ खास माधुरीसाठी तयार केला आहे. आणि हीच माधुरीसाठी महत्वाची बाब आहे. माधुरीच्या आईने विणलेला हा स्कार्फ तिच्यासाठी खास असल्याचं या फोटोतून दिसतं. 



माधुरीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर पसंतीला येत आहे. आपण पाहिलं आहे माधुरीने कशा पद्धतीने सोशल मीडियावर आपली वेगली ओळख निर्माण केली आहे. अनेक गोष्टी माधुरी दीक्षित सोशल मीडियावर शेअर करत असते. 


'बकेट लिस्ट' या सिनेमातून माधुरी दीक्षित मराठी सिनेमांत पदार्पण करत आहे. या सिनेमांतून रेणुका शहाणे आणि माधुरी तब्बल 23 वर्षांनी पहिल्यांदा एकत्र येत आहेत. या सिनेमाचा पहिला पोस्टर रिलीज झाला असून माधुरीचा हा लूक भरपूर पसंद केला जात आहे.