मुंबई : आपल्या सौंदर्याने, हास्याने, अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित. 90 चे दशक तिने चांगलेच गाजवले. त्यानंतर लग्न, मुलं, अमेरिकेत स्थायिक झाल्याने चित्रपटात तिचा ब्रेक पडला. मात्र पुन्हा मायभुमीत येत तिने आपल्या कारर्क्रीदीला सुरूवात केली. 3 वर्षांपूर्वी ती डेढ इश्किया या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर मात्र ती मोठ्या पडद्यावर दिसली नाहीये.


ही भुमिका नाकारली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र काही दिवसांपूर्वी माधुरीने अनिल कपूरच्या एका चित्रपटात झळकणार होती. मात्र माधुरी हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती भुमिका आईची असल्याने माधुरीने नकार दिला आहे. तिला असं वाटतंय की तिच्या फॅन्सना तिला शाहरूख, सलमानसोबत बघायचे आहे. तरुण अभिनेत्री साकारत असलेल्या भुमिका तिच्या वाट्याला याव्यात, असे तिला वाटते.


आणि अनिल कपूरच्या चित्रपटात तिला सोनमच्या आईची भुमिका साकारायची होती. मात्र याला तिने स्पष्ट नकार दिला.


मराठीत पर्दापण


तसेच माधुरी मराठीत चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी या चित्रपटाची कथा खूपच चांगली आणि हटके आहे.  या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे.