`आमच्यासाठी गर्वाचा क्षण`; माधुरी अन् श्रीराम नेनेंनी धाकट्या मुलासाठी केली भावुक पोस्ट
Madhuri Dixit Son Ryan Nene: माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असते. त्यातून आता माधुरी ही वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या सगळीकडेच दहावी-बारावीचे (SSC and HSC Results 2023) निकाल लागत आहेत. माधुरीच्या धाकट्या मुलानंही यात बाजी मारली आहे. सध्या त्याचे ग्रॅज्युएशनचे (Madhuri Dixit Son Graduation News) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Madhuri Dixit Son High School Graduation: अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आपल्या दिलखेचक अभियासाठी ओळखली जाते. आपल्या पन्नाशीतही ती तितकीच सुंदर आणि आकर्षक (Madhuri Dixit Hot) दिसते आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गही दिवसेंदिवस वाढतो आहे. जितकी माधुरी सोशल मीडियावर सक्रिय असते तितकीच तिची मुलही चर्चेत राहतात. माधुरीच्या धाकट्या मुलानं शैक्षणिक क्षेत्रात बाजी मारली आहे. माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी रियानच्या हायस्कूलचे ग्रॅज्युएशन (Ryan Nene) पुर्ण केले आहे. सध्या सोशल मीडियावर रियानच्या हायस्कूल ग्रॅज्युएशनचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे चाहते सगळीकडूनच त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
सध्या देशभरात दहावी आणि बारावीचे निकाल (SSC Results 2023) जाहीर होत आहेत. अशाच स्टारकीड्सही (Star Kids) मागे नाहीत. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. माधुरी दीक्षितच्या धाकट्या मुलानं रियान नेने यानं आपली दहावीची *Ryan Nene 10th Std Graduation) परीक्षा पुर्ण केली आहे. यावेळी माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी रियानच्या ग्रॅज्युएशनचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये रियान सुटाबुटात दिसतो आहे. त्याच्या एक सोलो आणि त्याच्या ग्रॅज्युएशनचा व्हिडीओ यावेळी त्यांनी पोस्ट केला आहे.
रियानच्या शिक्षकांसह आपला एक फॅमिली फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यावेळी आपल्या मुलाची ही यशस्वी कामगिरी पाहून माधुरी आणि श्रीरामही हळवे झाले आहेत.
हेही वाचा - ''परदेशात येऊन वडापाव खाणं म्हणजे...'' लंडनमध्ये सायली संजीवची खास दावत
'या' शाळेतून केलं शिक्षण पुर्ण
रियान हा अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून (American School of Bombay) दहावी पास झाला आहे. यावेळी माधुरीनं आणि श्रीराम यांनी लिहिलंय की, ''पालक म्हणून आमच्यासाठी अभिमानाचा क्षण: नव्या उभरत्या ताऱ्याला त्याच्या यशासाठी खूप खूप अभिनंदन''. माधुरीचा मोठा मुलगा अरिन हा परदेशात उच्च शिक्षण घेतो आहे.
माधुरीचा नुकताच नेटफ्लिक्सवरील 'मजा मां' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याआधी तिची 'द फेम गेम' ही सिरिजही प्रदर्शित झाली होती. या सिरिजचे आधी नाव 'अनामिका' असं होतं. माधुरीचा 'पंचक' हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी त्यांनी '15 ऑगस्ट' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.
माधुरीचा 'हा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला?
2018 साली प्रदर्शित झालेल्या 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटातून अभिनेत्री माधुरी दीक्षित मराठी (Madhuri Dixit Upcoming Marathi Movie) चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. माधुरी मराठी चित्रपटांमध्ये कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, माधुरी लवकरत 'धमाल 4' मध्ये दिसणार आहे.