मुंबई : आपल्या उत्तम अभिनयाने आणि बहारदार नृत्याने सर्वांना मोहिनी घालणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या करिअरची नवी इंनिंग सुरू करत आहे. या तिच्या नव्या इंनिंगमध्ये तिला साथ लाभणार आहे ती चक्क तिच्या पतीची डॉ. नेनेंची.


माधुरीची नवी इनिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या ब्रेकनंतर धक धक गर्ल माधुरी जुही चावलासोबत गुलाब गॅंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. २०१४ मध्ये आलेल्या या सिनेमात माधुरीचा दबंग अंदाज पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र एकाही मोठ्या सिनेमात ती दिसली नाही. आता ती पती श्रीराम नेनेंसोबत एक प्रॉडक्शन हाऊस सुरू करणार आहे.



हा सिनेमा पहिला


मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षितच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव RnM आहे. याची सुरूवात ती एका मराठी सिनेमापासून करणार आहे. आपल्या नव्या प्रॉडक्शन हाऊसची माहिती खु्द्द माधुरीने ट्वीट करुन दिली आहे. सिनेमातील तिच्या या नव्या इनिंगबद्दल ती खूप उत्सुक असल्याचेही तिने म्हटले आहे. हे मराठी कौटुंबिक मनोरंजन असून आमची टीम अत्यंत मस्त आहे.


लवकरच कॉमेडी सिनेमात


लवकरच माधुरी धमाल सिरीजच्या टोटल धमालमध्ये झळकेल. या सिनेमात माधुरीसोबत अजय देवगन, अनिल कपूर, रितेश देशमुख यांसारखे कलाकराही आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन इंद्रा कुमार करत आहेत.