Madhuri Dixit Kissing Scene: 80-90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे लोकप्रिय ठरले होते. त्या काळातही अनेक बॉलिवूड कॉन्ट्रोव्हर्सीज होत्या. त्यातून त्यावेळी सगळ्यात जास्त चर्चा रंगली होती ती माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या किसिंग सीनची. आजही त्याच्याबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसते त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात तेव्हा ही कॉन्ट्रोव्हर्सी झाली असेल याची आपल्यालाही कल्पना येऊ शकते. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे या सीनसाठी माधुरीनं घेतलेल्या मानधनाची. दयावान हा चित्रपट 1988 साली आलेला होता. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारही होते. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे या चित्रपटात विनोद आणि माधुरीचा काय सीन असेल हे प्रेक्षकांना माहिती असणेही अशक्यच. परंतु हा चित्रपट रिलिज झाल्यानंतर मात्र त्या सीनवरून बराच गदारोळ माजला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीनसाठी माधुरी दीक्षितनं चांगलेच मानधन घेतले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

80 च्या दशकापासून माधुरीनं आपल्या करिअरला सुरूवात केली होती. आता तिला या इंडस्ट्रीत तीसहून अधिक वर्षे झाली आहेत. माधुरी दीक्षित ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिच्याबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. तिच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत. तिच्या नृत्याचेही आपण सर्वच जण फॅन्स आहोत. त्यामुळे माधुरी दीक्षित हे नाव घेतलं तर मोहनी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे माधुरी दीक्षित ही चांगलीच चर्चेत असते. परंतु आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळातच माधुरीनं या चित्रपटात विनोद खन्नासारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत कीसिंग आणि इंटिमेट सीन्स दिल्यामुळे फारच मोठी चर्चा रंगलेली होती. आजही त्याची चर्चा रंगते. 


हेही वाचा -  नुकसानभरपाई! बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर Adipurush च्या निर्मात्यांनी निवडला 'हा' राजमार्ग 


मीडिया रिपोर्ट्सनुसार असे कळते की, दिग्दर्शक फिरोज खान यांची इच्छा नव्हती की या चित्रपटाच्या कोणत्याही सीनसाठी ती नको म्हणेल. कारण या चित्रपटातून विनोद खन्नाही आपलं स्थान प्रस्थापित करू पाहत होते. हा चित्रपट विनोद खन्ना यांच्या रिएसटॅब्लशिमेंटसाठीही फार महत्त्वाचा होता. त्यामुळे या चित्रपटासाठी सगळ्यांनीच चांगली मेहनत घेतली होती. माधुरीनं आपली एक वेगळी ओळख या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्थापित केली खरी. परंतु यातून दिलेल्या किसिंग आणि प्रचंड बोल्ड सीनमुळे तिला अनेकांनी आजच्या भाषेत त्या काळी ट्रोल केले होते.


तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले पण माधुरी दीक्षितनं या सीनसाठी 1 कोटी रूपये घेतले होते. त्यातून त्या काळीही आजच्याप्रमाणे हा सीन बॅन करण्याची मागणी केली होती. त्याचसोबत दिग्दर्शक फिरोज खान यांना चित्रपटातून हा सीन हटवण्याचीही मागणी केली होती.