‘महाभारत’ फेम अभिनेत्याच्या लग्नात वादळ; चार वर्षांपासूनच्या एकटेपणावर घटस्फोटाचा पूर्णविराम
रोहित भारद्वाज यानं पत्नी पूनम हिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे.
मुंबई : एकिकडे कला जगतामध्ये काही सेलिब्रिटी जोड्यांमध्ये लगीनघाई दिसून येतानाच एका जोडीच्या नात्यात मात्र आता घटस्फोटाचं वादळ आलं आहे. पत्नीसोबतच्या मतभेदांमुळं लोकप्रिय अभिनेता मागील चार वर्षांपासून वेगळा राहत होता. अखेर त्याच्या या एकांताला आता घटस्फोटाचा पूर्णविराम लागत असल्याचं म्हटलं जात आहे.
महाभारत, या गाजलेल्या मालिकेमध्ये युधिष्ठीर साकारणाऱ्या अभिनेता रोहित भारद्वाज यानं पत्नी पूनम हिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे.
2017 मध्ये इंडोनेशियाच्या सहलीवरून परत आल्यानंतर पत्नीसोबत आपलं कडाक्याचं भांडण झाल्याचं रोहित म्हणाला. एका मुलाखतीत त्यानं यासंबंधीची माहिती देताना लग्नानंतरपासूनच पत्नीसोबत आपला ताळमेळ बसत नसल्याचं सांगितलं. ती सहल यात आणखी भर टाकणारी ठरली आणि हे नातं घटस्फाच्या वळणावर आलं.
रोहित आणि त्याची पत्नी गेले 4 वर्ष एकमेकांपासून दूर राहत आहेत. पुढील दोन महिन्यांमध्ये आपल्या घटस्फोटाची प्रक्रियाही पूर्ण होणार असल्याचं त्यानं सांगितलं.
रोहितच्या आयुष्यात वादळ...
पत्नीपासून दुरावलेल्या रोहितनं 2021 मध्ये आईलाही गमावलं. एकट्या पडलेया वडिलांसाठी मुंबई- दिल्ली असा त्याचा प्रवास सातत्यानं सुरु असतो. दरम्यान, पत्नीपासून वेगळं झाल्पासून रोहितला त्याच्या 10 वर्षांच्या मुलीलाही भेटता येत नाहीये. ती पत्नीसोबत असल्यामुळं आपली तिची गाठ पडत नसल्याचंही त्यानं मुलाखतीत सांगितलं.