मुंबई : नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात .गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा  'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तत्पूर्वी 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्कार सोहळ्यात विविध विभागांमध्ये नामांकन यादीत कोणी बाजी मारली हे निश्चित झाले आहे . झी टॉकीज वाहिनीवर हा दिमाखदार पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाचा आणि कलेचा कस लावून रसिक मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी कलाकारही वाट पाहत असतात .त्यांच्या कलेला दाद देणारा आणि रसिकमनाची पावती देणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' हा पुरस्कार रसिकांच्या पसंतीतून निवडला जातो. नुकतीच या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली. या जाहीर झालेल्या नावांमधून  रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतानंतर ‘महाराष्ट्राचा फेवरेट’ ही मानाची ट्रॉफी कलाकारांना दिली जाणार आहे. यासाठी रसिक प्रेक्षक आपले मत नोंदवू शकतात, त्यासाठी झी 5 च्या <share link here>वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराला वोट करू शकतात.



 दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत .यामध्ये महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट , फेवरेट दिग्दर्शक , फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री , फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक , फेवरेट लोकप्रिय चेहरा , फेवरेट स्टाईल आयकॉन, फेवरेट गीत, फेवरेट गायक , फेवरेट गायिका आणि फेवरेट चित्रपट बाह्य गीत या विभागांसाठी नामांकने जाहीर झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत यावर्षी वेड, बाईपण भारी देवा, सुभेदार ,महाराष्ट्र शाहीर ,वाळवी, नाळ २, झिम्मा २ ,  घर बंदूक बिरयानी या चित्रपटांनी नाव कोरली आहेत. त्यामुळे प्रेक्षक पसंतीचा कौल यंदा कोणत्या सिनेमाला मिळतो आणि महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट कोणता ठरतो, हे लवकरच समजणार आहे . महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्याकडे रसिकांचेही लक्ष लागले आहे.