महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम `ह्या` अभिनेत्रीचा किसींग फोटो व्हायरल
Vanita Kharat Pre-Wedding Photoshoot : मराठी सिनेसृष्टीतील्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या किसींग फोटोने सध्या धुमाकूळ घातला आहे. लवकरच ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.
Vanita Kharat Viral Photo : सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु झाली आहे आहे. मराठी सिनेसृष्टीतून लग्नाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नुकतंच हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Devdhar) यांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटत पार पडला. या सेलिब्रिटी कपल (Celebrity Couple) च्या लग्नात बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
आता मराठी सिनेसृष्टीतील अजून एक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtra Chi Hasya Jatra) या शोमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
अशातच आता वनिताने आपला होणार पती सुमित लोंढेसोबत (Vanita Kharat - Sumit Londhe) प्री वेडिंग फोटोशूट केलं आहे. वनिताने सुमितसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. वनिता आणि सुमितच्या या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी तसेच सेलेब्रिटी वनिता आणि सुमितला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.
'सरला एक कोटी' (Sarala Ek coti) या सिनेमाच्या ट्रेलर लाँन्चला आलेल्या वनिताने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. ती येत्या २ फेब्रुवारी रोजी लगीनगाठ बांधत असून लवकरच ती याबाबत अजून माहिती देणार आहे. लग्न जवळ आलं असलं तरी तिला तयारीला अजिबातच वेळ नाही. ती शूटिंग सांभाळत मिळालेल्या वेळात तयारी करत असल्याचं तिने सांगितलं.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. वनिताच्या लग्नाची तारीख अनेकदा जास्यजत्रेच्या अनेक स्किटमध्ये वापरण्यात आल्याचं देखील यावेळी तिने सांगितलं.सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर असून, त्याला फिरण्याची प्रचंड आवड आहे. वनिता खरात आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.अभिनेत्रीच्या लग्नाला केवळ 10 दिवस उरले आहेत.नेटकरी तसेच सेलेब्रिटी वनिता आणि सुमितला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा' ((Maharashtra Chi Hasya Jatra) या शोमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री वनिता खरातने (Vanita Kharat) मराठीत तर आपला नाव कमावलचं आहे पण त्याचसोबत हिंदीमध्ये सुद्धा वनिताने आपला झेंडा रोवलाय कबीर सिंग (Kabir Singh) सिनेमात तिने छोटीशी भूमिका साकारली होती पण त्यातून ती खूप प्रसिद्ध झाली. उत्तम अभिनय हाच कलाकाराचा खरा दागिना असतो, मग त्याच्यासमोर रंग रूप देहयष्टी सगळं अगदी नथिंग असत हे वनिताने दाखवून दिलं.