Maharashtra Shaheer : लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) हे त्यांचा आगामी चित्रपट महाराष्ट्र शाहीरमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं. चित्रपटातील गाण्यानं तर सगळ्यांना वेड लावलं होतं. चित्रपटात शाहीर साबळेची भूमिका अंकुश चौधरीनं (Ankush Choudhary) साकारली आहे. तर हा चित्रपट केदार शिंदे यांचे आजोबा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. केदार शिंदे हे शाहीर साबळेंच्या 100 व्या जन्मशताब्दी निमित्तानं प्रेक्षकांसाठी हा चित्रपट घेऊन येत आहेत. दरम्यान, केदार शिंदे यांनी या चित्रपटासाठी कशा प्रकारे तयारी केली त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केदार शिंदे यांनी हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहीर साबळेंची भूमिका साकारण्यासाठी त्याचा लूक कसा तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला त्याचा लूक तयार होण्यापासून शाहीर साबळेंच्या बॉडी पॉश्चरपासून सगळ्या गोष्टी कशा झाल्या हे अंकुशनं या व्हिडीओत दाखवले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओची सुरुवात ही अंकुशचं चेहऱ्याचं माप घेण्यापासून होते. त्यानंतर त्याची दाढी काढण्यापासून ते मेकअप पर्यंत सगळ्या गोष्टी त्यात दिसत आहेत. त्यासाठी मेकअप मॅनपासून अंकुशनं खूप मेहनत घेतली होती. हे त्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या अखेरीस जेव्हा अंकुशचे फोटो काढण्यात आले त्यावेळी शाहीर साबळेंचं बॉडी पॉश्चर कसं आहे ते कसे उभे राहायचे हे त्या केदार शिंदे दाखवत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अंकुशनं कॅप्शन दिलं की 'असा घडलाअंकुश चौधरीमध्ये बदल. महाराष्ट्र शाहीर होण्याचा हा अदभुत प्रवास.'


हेही वाचा : 'मी त्यांना डायरेक्ट प्रपोज केलं...', Prajakta Mali चा लव्ह लाईफविषयी खुलासा


अंकुशचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'सुपरग्रेट दादा, खूप सुंदर संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.' दुसरा नेटकरी म्हणाला,' कमाल दादा' तर अंकुशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


दरम्यान, या चित्रपटात अंकुशसोबत सना शिंदे,श्विनी महांगडे, निर्मिती सावंत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर चित्रपटाच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं आहे. तर हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटातील गाऊ नको किसना हे गाणं तर प्रेक्षकांनाच्या प्रदर्शित झाल्यानंतर वेड लावलं होतं. हा गाणं जयेश खरे यानं गायलं होतं.