Maharashtra Shahir Box Office Collection: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं अवघ्या तीन दिवसात (Shair Sable Biograbhy) कोट्यवधींची कमाई केली आहे. महाराष्ट्राचे लाडके गायक शाहीर साबळे अर्थात कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरूनही या प्रेक्षकांनी हा चित्रपट आवडल्याचे सांगितले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं तीन दिवसात 1 कोटींचा गल्ला पार केला आहे आणि हा चित्रपट आता 2 कोटींच्या पुढे कूच करतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहीर साबळे यांची भुमिका ही सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीनं केली असून त्यांच्या पहिल्या (Sana Shinde in Maharashtra Shahir) पत्नीची भुमिका चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे हिनं केली आहे. सनाचा हा पहिल्याच चित्रपट असून तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे. अंकुश चौधरीच्याही भुमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आहे.


शाहीर साबळेंभोवती फिरणारा महाराष्ट्रातला तो जूना काळ, त्यावेळीचे राजकारण, समाजकारण, संस्कृती, आपलं स्वत:चा संघर्ष आणि कुटुंब या सगळ्यांचा आढावा या चित्रपटातून फार अनोख्या पद्धतीनं घेण्यात आला आहे आणि हा प्रयत्न आता यशस्वी ठरला आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रासह सर्वत्र गाजतो आहे. (Maharashtra Shahir box office collection crossed 1 crore rupees)


किती केलं बॉक्स ऑफिस कलेक्शन? 


Sachnik या वेबसाईटनूसार, 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटानं पहिल्या दिवशी (Maharashtra Shahir Box Office Collection Day 4) 0.3 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 0.55 कोटी रूपयांची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 0.8 कोटींची कमाई केली असून चौथ्या दिवशी 1.03 कोटींची कमाई केली आहे. 22 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. त्यामुळे इतकी मोठी स्पर्धा असतानाही मराठी चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सुखवणारं चित्र दिसते आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटांच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 



सुट्टीचा फायदा


शाहीर साबळे यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचाही फायदा झाल्याचा दिसतो आहे. मे महिन्याच्या सुट्टीचाही या चित्रपटाला फायदा होईल. 1 मे च्या महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीनिमित्तंही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.