Shenal Shidam Instagram Post: चला हवा येऊ द्या फेम स्नेहल शिदमनं थोड्याच वेळात आपल्या अभिनयानं सगळ्याचं रसिक मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यातून आता स्नेहल शिदम लवकरच विवाहबंधनात अडकणार की काय असे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपुर्वी चला हवा येऊ द्याची (Chala Hawa Yeu Dya) कॉमेडी कलाकार स्नेहल शिदम हिनं एक इन्टाग्राम पोस्ट शेअर केली होती ज्यात तिनं आपला फोटो महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने ह्याच्यासोबत शेअर केला होता. ज्या फोटोची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. त्यातून आता ते दोघं लग्न करणार की नाही याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. स्नेहल शिदम आणि निखिल बने हे दोघंही विनोदी कलाकार आहेत. (Maharashtrachi Hasyajastra fame nikhi bane open up on their romantic photo shared by shenam shidam on instagram)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नेहल शिदम आणि निखिल बने हे खूप चांगले मित्र आहेत. परंतु त्यांच्या एकमेकांसोबत दिलेल्या रॉमेण्टिक पॉझमुळे आता सगळीकडेच चर्चांना उधाण आलं आहे यावर श्रेया बुगडे, हेमांगी कवी या अभिनेत्रींनीही कमेंट्स केल्या आहेत. श्रेया बुगडेनं (Shreya Bugde) कमेंट केली आहे की, हे काय तु मला सांगितलं नाही, मेकरूममध्ये लगेच ये, नीड अपडेट. तर हेमांगी कवीनं (Hemangi Kavi) पोस्टखाली कमेंट केली आहे की, बरं बरं बरं. त्यामुळे या कमेंट्सवरूनही चर्चांना उधाण आलं आहे. पिरतीच्या फडात ग, धरला हात असा, काळीज येंधलं आरल असं कॅप्शन स्नेहल शिदमनं लिहिलं आहे. 


त्या दोघांच्या या पोस्टची सगळीकडेच चर्चा होत असताना आता निखिल बनंचं उत्तर व्हायरल होत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तो म्हणाला की, व्हायरल होत असलेल्या चर्चांवर मला काहीही बोलायचे नाही. पण मला हे खूप छान वाटतंय ऐकून की आम्ही दोघं सध्या ट्रेण्डमध्ये आहोत. स्नेहलला मी बरीच वर्षे ओळखतो. आम्ही दोघंही कॉलेजमध्ये एकत्र होतो. कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघांनी खूप नाटकांमध्ये कामं केली आहेत. तेव्हापासून आमच्यात फार चांगली मैत्री आहे. बऱ्याच दिवसांनी आम्ही वनिताच्या लग्नात भेटलो तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांसोबत एक फोटो काढला.


तो खूप चांगला आला आणि म्हणून तो आम्ही सोशल मीडियावर (Shenal Shidam Instagram Post) पोस्ट केला. पण त्यावरून इतक्या बातम्या होतील याची मला काही कल्पना नव्हती. पण आम्ही लोकांच्या मनात आहोत हे ऐकून फार छान वाटतंय. हव्या तेवढ्या बातम्या करा. आम्हालाही काहीच हरकत नाही. आम्ही चांगले मित्र आहोत आणि आम्ही चांगलेच मित्र राह, असं निखिलनं म्हटलं आहे.