Sachin goswami post for Namrata Sambherao : 'नाच गं घुमा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी प्रेक्षक नम्रता संभेरावच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती करत आहेत. या सगळ्याच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी नम्रता संभेरावसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी नम्रताचं कौतुक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की "नाच ग घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी... अफलातून कामगिरी.. तुझा अभिमान वाटतो नम्रता.." त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर नम्रतानं सचिन गोस्वामी यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नम्रता कमेंट करत म्हणाली "सर, आभारी आहे... तुमच्याकडूनच आलंय सगळं." तर दुसरीकडे या चित्रपटाची लेखिका आणि निर्माती मधुगंधानं कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, "सर, माझ्या आणि परेशसाठी पण पाहू द्या की... मस्करी करते पण मनानं खूप अप्रतिम काम केलं आहे, त्यात वादच नाही." तर सचिन गोस्वामी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नम्रताच्या अभिनयाची स्तुती केली आहे.



हेही वाचा : Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video


'नाच गं घुमा' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्यानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 2.13 कोटींची कमाई केली. तर sacnilk नं दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसात या चित्रपटानं 3.90 कोटींची कमाई केली. या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं स्वप्नील जोशी निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. तर या चित्रपटाची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे.