Shivali Parab Trolled: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवाली परब आपल्या हटके स्टाईलनं चाहत्यांना कायमच घायाळ करताना दिसते. तिचं फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे. अनेकदा ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. सध्या तिची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे शिवाली ट्रोल झाली आहे. यावेळी तिनं शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तिनं ग्रे कलरचा शिमर शॉर्ट मिडी घातली आहे. परंतु या ड्रेसमुळे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग सहन करावे लागते आहे. या पोस्टखाली अनेकांनी नानाविध कमेंट्स केल्या आहेत. शिवाली परब आपलं नवीन हटके फोटोशूट नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी तिचं सिल्व्हर वनपीसमधलं फोटोशूट सोशल मीडियावर गाजतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोकडे कपडे घातल्यानं अनेकदा अभिनेत्रींना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. अनेक चाहत्यांना त्यांचे नवनवीन फोटोज आवडत जरी असले तरीसुद्धा नेटकरी मात्र त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल करतात. त्यांच्या ड्रेसिंग सेन्समुळे त्यांना अधिकवेळा ट्रोल केले जाते. कित्येकदा कलाकार याकडे दुर्लेक्ष करतात तर बऱ्याचदा ट्रोल झालेल्या अभिनेत्री त्याला सडेतोड उत्तरही देतात. अनेकदा आपल्याला सोशल मीडिया पोस्टखालीच हे ट्रोलर्स आणि कलाकारांमधील कमेंटवॉरही पाहायला मिळते. सध्या आपल्या या शॉर्ट ड्रेसमुळे अभिनेत्री शिवाली परब ही ट्रोल जरी झाली असली तरीसुद्धा यावर अद्याप शिवाली परब यानं उत्तर दिलं नाही. 


सध्या तिच्या या पोस्टवर नाना कमेंट्स येताना दिसत आहे. परंतु जास्तकरून तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. एका युझरनं लिहिलंय की, 'जेवढा पैसा, प्रसिद्धी जास्त तेवढे कपडे कमी होतात का?' दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, 'जेव्हा तुमची उंची कमी असते तेव्हा ह्या अॅंगलनी फोटो काढा तुम्ही जिराफ पेक्षाही उंच दिसाल' तर आणखी एका युझरनं लिहिलंय की, 'काय वेशभूषा आहे तुझी, सुधर जरा... अजून तू अॅक्ट्रेस नाही आहेस.. लोकं मनातून कळायच्या आधी स्वत:ला सावरून घे'. अशाच एका युझरनं लिहिलंय की, 'तूला राग येनं ग पण तू महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करते तूला कळायला पाहिजे' तर तिसऱ्यानं कमेंट केली आहे, 'तू नॉर्मल दिसतेय तसा बरा दिसत ह्या नको झाल्ला काय फालतू कपडे छपरी लोकांसारखे'



सध्या तिला नेटकऱ्यांनी सपाटून ट्रोल केलं आहे. तिच्या विनोदानं अनेकांना घायाळ केलं असलं तरीसुद्धा आता तिच्या या लुकनं सगळ्यांनीच तिला ट्रोल केलं आहे.