मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरनंतर आता त्यांच्या लग्नाच्या अल्बमची चर्चा आहे.  सोशल मीडियावर फक्त आलिया आणि रणबीरच्याचं फोटोंची चर्चा नाही, तर कपूर आणि  भट्ट कुटुंबाचे फोटो देखील ट्रेंड करत आहेत. सध्या सर्वत्र आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरू असताना, रणबीरसोबत सासरे म्हणजे महेश भट्ट यांचा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीरचा सासऱ्यांसोबत फोटो देखील तुफान चर्चेत आहे. आलियाची बहीण आणि महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्टने रणबीर आणि महेश भट्ट यांचा फोटो पोस्ट केला आहे. 


इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ती म्हणाली, 'शब्दांची गरज नसते, जेव्हा मनामध्ये ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता असते....' पूजाच्या या पोस्टवर फक्त सेलिब्रिटी नाही, तर चाहते देखील प्रेमाचा वर्षाव करत आहेत.. 



लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, रणबीर आणि आलिया 14 एप्रिल रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. दोघांनीही लग्न अत्यंत गुपित ठेवलं. या जोडप्याने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं.


लग्न झाल्यानंतर आलिया आणि रणबीर मीडियासमोर आला आणि फोटोग्राफर्सना पोजही दिली. सध्या त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.