मुंबई : आपली लाईफस्टाइल इतकी बदलली आहे की, आपण दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जात आहे. यामुळे प्रत्येकाला तणावातून जाव लागत आहे. यामुळे मानसिक रोग वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात देखील आत्महत्येचं प्रमाण वाढतं. अशातच बॉलिवूडमध्ये देखील अशा समस्या समोर येत आहे. म्हणून हा विषय केंद्रस्थानी ठेवून सिनेमे तयार करत आहे. याबाबत 'द डार्क साइड ऑफ लाइफ : मुंबई सिटी' ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमातील खास गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अभिनय केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक घरात आहे मानसिक रोगी 


महेश भट्ट यांनी ट्रेलर लाँचिंगच्यावेळी सांगितलं की, जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो तेव्हा तुम्हाला इन्सुलिन शॉट घ्यावे लागतात. मात्र मानसिक आजाराबद्दल आपण फार काही विचार करत नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. मात्र आपल्या देशात मानसिक आजाराबद्दल फार कमी जागरूकता आहे. 



महेश भट्ट यांनी सांगितले की, आपल्या देशात मानसिक आजाराची जागरूकता फार कमी आहे. महेश भट्ट यांनी सोमवारी अभिनेता निखिल रत्नपारखी, अलीशा खान, दिग्दर्शक तारिक खान आणि निर्माता राजेश परदासानीसोबत ट्रेलर लाँच केला.