Veer Savarkar Biopic: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'वीर सावरकर' (Veer Savarkar) जीवनपट पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा चित्रपट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित करणार होते, पण आता त्यांनी या प्रोजेक्टवर काम करण्यास नकार दिला आहे. महेश मांजरेकर यांनी मार्च महिन्यात या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर केली होती. एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, निर्मात्यांशी बोलल्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने चित्रपटापासून दूर झाले आहेत. सध्या तरी या चित्रपटाच्या नव्या दिग्दर्शकाची घोषणा झालेली नाही. बिग बॉसचे होस्टिंग आणि इतर कमिटमेंट्समुळे चित्रपटापासून दूर झाल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा रणदीप हुड्डाच (Randeep Hooda) या चित्रपटाचे दिग्दर्शन करू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्चमध्ये त्याने रणदीप हुड्डासोबतचा फोटो शेअर करताना या चित्रपटाची माहिती दिली होती. त्यांनी ट्विटरवर लिहिले, 'काही कथा सांगितल्या जातात आणि काही जगल्या जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर बायोपिकचा एक भाग बनल्याबद्दल कृतज्ञ, उत्साहित आणि सन्मानित.'



या चित्रपटासाठी रणदीपने खूप मेहनत घेतली आहे. काही दिवसांपूर्वी, अभिनेत्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. या चित्रपटासाठी त्याने 18 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं जात आहे.



महेश मांजरेकर यांनी अलीकडेच सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर अल्टीमेट: द लास्ट ट्रुथ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ते 'वीर दौडले सात' दिग्दर्शित करताना दिसणार आहे. याशिवाय बिग बॉस मराठीचा चौथा सीझनही होस्ट करणार आहेत.