Mahima Chaudhary on Being Cheated : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीनं सुभाष घई यांच्या 'परदेस' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. महिमानं तिच्या अभिनयानं सगळ्या प्रेक्षकांना वेड लावलं. पण सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या गोष्टीविषयी रंगली असेल तर तिच्या आणि माजी भारतीय टेनिसपटू लिएंडर पेससोबतच्या रिलेशनशिपची. ते जवळपास 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि महिमा ही नेहमीच लिएंडर पेसला पाठिंबा द्यायची. जेव्हा केव्हा लिएंडरची मॅच असायची तेव्हा ती स्टेडियममध्ये उपस्थित असायची. मात्र, काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला आणि त्याचं कारण लिएंडरचं मॉडेल रिया पिल्लईसोबतच्या अफेअर असल्याचं म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिस मालिनी' ला दिलेल्या मुलाखतीत महिमानं तिच्या भुतकाळातील नात्यावर चर्चा केली आहे. त्याविषयी बोलताना महिमा म्हणाली, 'तो एक चांगला टेनिसपटू असू शकतो, पण त्यानं मला कधीच चांगली वागणूक दिली नाही. जेव्हा मला कळलं की तो कोणा दुसरीसोबत फिरत आहे. तर हे माझ्यासाठी धक्कादायक नव्हतं. त्याच्या जाण्यानं माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नव्हता. त्यामुळे मी अधिक मजबूत झाले.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महिमाला वाटलं की लिएंडर पेसनं रिया पिल्लईसोबत देखील असचं केलं. त्याचं कारण म्हणजे पेसला रियाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होतं. त्यावेळी कोर्टानं माजी टेनिसपटूला गर्लफ्रेंड अर्थात रियानं घर सोडल्यास तिला 1 लाख रुपयांच्या मासिक देखभालीशिवाय 50,000 रुपये मासिक भाडे देण्याचे निर्देश दिले. महिमानं 2006 मध्ये आर्किटेक्ट बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये, हे दोघं एकमेकांमध्ये सुरु असलेल्या वादांना पाहता वेगळे राहू लागल्याची बातमी समोर आली. तर महिमा आणि बॉबी मुखर्जी यांना एक मुलगी असू एरियाना असं तिचं नाव आहे. एरियाना ही 8 वर्षांची आहे. 


हेही वाचा : VIDEO : पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर संतापला जॉन अब्राहम; म्हणाला, 'मूर्ख आणि...'


महिमाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच कंगना रणौतच्या 'एमरजंसी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती पुपुर जयकरच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सांस्कृतीक कार्यकर्ता आणि लेखक पुपुल जयकर यांचं नेहरू कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते. 6 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिलिंद सोमन, विशाख नायर, श्रेयस तळपदे आणखी बरेच कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 1975 आणि 1977 च्या भारतावर आधारीत आहे. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी 'एमरजंसी' ची घोषणा केली होती.