Mahima Daughter Aryana Same as Aaradhya : स्टार किड्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. कलाकारांसोबतच स्टार किड्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु असते. सध्या सोशल मीडियावर चर्चा ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी आणि तिची लेक अरियाना चौधरीची सुरु आहे. त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या दोघींनी एकत्र फोटो काढल्यानं पापाराझींनी त्यांचे आभार मानले आहे. महिमा चौधरीचा आणि तिच्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिमा चौधरी आणि तिच्या मुलीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ अभिनेता विद्युत जामवालच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या IB71 या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळीचा आहे. या व्हिडीओत महिमानं बदामी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर तिची लेक अरियाना खूप सिंपल लूकमध्ये दिसत होती. त्या दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांना ऐश्वर्या राय आणि आराध्याची आठवण आली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अरियाना आणि महिमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अरियानाला पाहून तिचे लाखो चाहते झाले. अनेकांनी कमेंट करत महिमाची स्तुती केली. तर काही नेटकऱ्यांनी अरियानाची तुलना आराध्याशी केली. एका नेटकऱ्यांनं तर चक्क कमेंट केली की आराध्याचा हेअरकट कॉपी केला आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, ही तर बिल्कुल ऐश्वर्याची लेक आराध्या सारखीच दिसते. एक नेटकरी म्हणाला, ही मुलगी तिच्या आईसारखीच क्यूट आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, आराध्या पेक्षा ही सुंदर दिसते. तिसरा नेटकरी म्हणाला, बहिणींसारख्या दिसतात. आणखी एक नेटकरी म्हणाला, तिनं फक्त आराध्याची हेअर स्टाईल कॉपी केली आहे बाकी दिसायला तिच्या पेक्षा सुंदर आहे. 


हेही वाचा : एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत Sushmita Sen चं पॅचअप? 'त्या' सिझलिंग फोटोमुळे एकच चर्चा


दरम्यान, त्या दोघींना एकत्र पाहून नेटकऱ्यांना आराध्या आणि ऐश्वर्या यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे आराध्या आणि अरियानाची असलेली हेअर स्टाईल आहे. त्यासोबत ज्या प्रकारे ऐश्वर्या नेहमीत आराध्यासोबत राहते तशीच महिमा तिच्या मुलीसोबत दिसली. 


महिमा विषयी बोलायचे झाले तर तिनं 2006 साली बॉबी मुखर्जीशी लग्न केलं. पण 2013 साली दोघं विभक्त झाले. त्यानंतर महिमा एक सिंगल मदर असून एकटीच अरियानाचा सांभाळ करते. अरियाना ही 16 वर्षांची असून तिला बॉलिवूड डेब्यू विषयी विचारण्यात आले असता तिनं यासाठी होकार दिला होता. तिला देखील आई प्रमाणे अभिनेत्री व्हायचे आहे.