Mahima Chaudhry Single Mother have a daughter Aryana Chaudhry : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. महिमानं 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. महिमानं ज्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तो म्हणजे 'परदेस'. त्या आधी महिमानं छोट्या पडद्यावर आणि काही कमर्शिअल्सवर काम केलं होतं. महिमानं तिच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत... पण महिमा कधीही खचली नाही. याचं उदाहरण द्यायचं झालं तर महिमानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला कर्करोग झाल्याचा खुलासा केला होता. महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. आज महिमा ही ‘सिंगल मदर’ म्हणून ओळखली जाते. महिमाही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे असते. महिमाचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. महिमा आज सिंगल मदर असून सोशल मीडियावर तिच्या मुलीसोबतचे अनेक फोटो देखील शेअर करत असते. तिच्या प्रमाणे तिची लेकही खूप सुंदर आहे. (Mahima Chaudhry Single Mother) 


महिमा चौधरी आणि लिएंडर पेस रिलेशनशिप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिमा जेव्हा तिच्या करिअरच्या पीकवर होती तेव्हा ती टेनिस प्लेयर लिएंडर पेसहिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. जेव्हा पण लिएंडर पेसची मॅच असायची तेव्हा त्याला पाहण्यासाठी महिमा स्टेडियममध्ये पोहोचायची. महिमा आणि लिएंडर पेस हे जवळपास 3 वर्षे एकत्र होते. त्यानंतर 2003 साली अचानक लिएंडर पेस आणि मॉडेल रिया पिल्लईच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. आता तुम्हाला प्रश्न असेल की रिया पिल्लई कोण आहे. तर ती संजय दत्तची दुसरी पत्नी आहे. महिमानं याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिनं लिएंडर पेससा रिया पिल्लईसोबत फोनवर बोलताना रंगे हाथ पकडलं होतं. महिमाला सगळ्यांगोष्टीचा अंदाज आला आहे हे कळताच लिएंडर पेसनं त्यांचं रिलेशनशिप तोडण्याचा निर्णय घेतला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी लग्न


दरम्यान, 2006 साली कोलकातामध्ये राहणाऱ्या आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी महिमाची पहिली भेट झाली. बॉबी मुखर्जी हा महिमाच्या भावाचा मित्र होता त्यामुळे त्या दोघांचे इव्हेंटमध्ये नेहमीच भेटणे व्हायचे. अनेक वेळा भेटल्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याचवर्षी 19 मार्च रोजी महिमानं लास वेगसमध्ये बॉबी मुखर्जीशी लग्न केलं. लग्नानंतर महिमानं कोणालाही या विषयी सांगितलं नाही. तिनं तिचं लग्न हे सिक्रेटच ठेवलं. जेव्हा महिमाचं बेबी बंप दिसलं तेव्हा तिनं तिच्या सिक्रेट वेडिंगविषयी सांगितलं. मात्र, महिमानं तिच्या लग्नाविषयी सांगण्या आधीच ती लग्नाआधी प्रेग्नंट झाली अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकंच काय तर ती प्रेग्नंट होती आणि त्यामुळेच तिनं लग्नाची घाई केली असं म्हटलं जाते. 


हेही वाचा : Bachchan कुटुंब असं करायचं होळीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत!


2007 साली महिमानं तिच्या मुलीला अरियानाला जन्म दिला. त्यांचं कौटुंबीक आयुष्य खूप सुंदर सुरु होते. मात्र, अचानक एक दिवस बॉबी यांचं पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत कायदेशीर लढाई सुरु झाली, तेव्हा महिमा आणि बॉबी यांच्यात वाद होऊ लागले. त्यांच्या नात्यात अंतर येऊ लागलं होतं. बरीच वर्षे हे सुरु असल्याचं पाहत त्यांनी 2013 साली घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, मात्र अशा चर्चा आहेत की त्यांनी घटस्फोट घेतला नाही. तेव्हापासून महिमा एकटी तिच्या मुलीचा सांभाळ करत आहेत.