या अभिनेत्रीने मित्राच्या लग्नात लावले ठुमके!
बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या रईस सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या रईस सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी माहिराचा रणबीर कपूरसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. माहिरा लवकरच '7 दिन मोहब्बत इन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या ती आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान ती आपल्या फ्रेंडच्या लग्नात सहभागी झाली होती. या लग्नातील माहिराचे व्हिडिओज चांगलेच व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत माहिरा आपल्या फ्रेंड्सोबत एन्जॉय करताना दिसत आहे. यात माहिराचे बॉलिवूड गाण्यांवरचे ठुमके पाहण्यासारखे आहेत.
हे व्हिडिओज सोशल मीडियावर माहिरा खानच्या फॅन क्लबने शेअर केले आहेत. पहा तिचे हे डान्स व्हिडिओज...
रईस सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी माहिरा खान पाकीस्तानी अभिनेत्री आहे. तिचा जन्म कराचीत झाला असून लवकरच तिचा '7 दिन मोहब्बत इन' या सिनेमात झळकेल.