मुंबई : अभिनेता रणबीर कपूरचं कतरिनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचं पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत सूत जुळल्याची चर्चा आहे. अनेकदा या दोघांना एकत्र बघण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर हा तिच्यासोबत असताना मीडियापासून तोंड लपवतानाही पकडला गेला आहे. आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र बघण्यात आलंय. दोघेही सोबत जे करत होते त्याची चर्चा जोरदार रंगली आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूर हा पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिला डेट करतो आहे. दोघांनीही अनेक मुलाखतींमध्ये एकमेकांचं तोंडभरून कौतुक केल्याचं बघायला मिळालं. मात्र दोघांनीही याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाहीये. दोघेही यावर मूग गिळून गप्प बसले आहेत. 



आता त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात दोघेही एका रस्त्यावर एकत्र सिगारेटचे झुरके मारताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूर आणि माहिरा खान यांचा हा फोटो अमेरिकेतील आहे. आता हा फोटो समोर आल्याने या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय हे कन्फर्म झाल्याचं बोललं जात आहे.