मुंबई : मिलिंद सोमण पाठोपाठ आता मकरंद देशपांडे देखील आपल्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकीला माफी नाही असा लोकप्रिय डायलॉग ज्यांच्या नावे आहे असे मकरंद देशपांडे कायमच आपल्या अभिनयामुळे वेगळे ठरतात. पण आता 'डॅडी' म्हणजे मकरंद देशपांडे आपल्या २० वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आले आहेत. मकरंद देशपांडे यांचा गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो चर्चेत आला आहे. यामध्ये घरात चुकीला माफी नाही' असं कॅप्शन निवेदिताने या फोटोला दिल्याने दोघं लिव इन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 



कोण आहे मकरंद यांची गर्लफ्रेंड 


मकरंद देशपांडे यांच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे निवेदिता पोहनकर. ती लेखिका असून पृथ्वी थिएटरशी जोडली गेलेली आहे. रंगभूमीवर वावरतानाच या दोघात प्रेमाचे नातं निर्माण झाल्याचे सांगण्यात येतं. गेल्या ७-८ वर्षांपासून दोघं एकत्र आहेत.मकरंद आणि निवेदिता ब-याचदा एकत्र पाहायला मिळतात. तसेच खुद्द मकरंद यांनीच पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे जाहिरपणे सांगितले आहे.निवेदिता मराठी अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहिण आहे. तिची आई शोभा पोहनकर नॅशनल लेव्हल हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पियन आहेत.याशिवाय तिचे काका अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत.



या अगोदर यांच्यासोबत जोडलं गेलं मकरंदचं नाव 


शशी कपूर यांची कन्या संजना कपूर आणि दुसरी अभिनेत्री म्हणजे 'दिल चाहता है' फेम सोनाली कुलकर्णी. सोनालीसोबत तर मकरंद जवळजवळ चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हटले जाते. या दोघांचे प्रेम संबंध संपुष्टात आल्यानंतर त्यांनी प्रोफेशनल रिलेशन मात्र जपले.


निवेदिता आणि मकरंद यांच्या वयात तब्बल 20 वर्षांचे अंतर आहे. 2015 साली हे दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त आले होते. या दोघांचे लग्न झाले की नाही हे अद्याप उघड झालेले नाही. पण ठिकठिकाणी हे दोघे एकत्र दिसत असतात.