Malaika Arora Reply to Arhaan Khan's Friend : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. मलायका सध्या पॅरिसमध्ये आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मलयाकानं तिच्यात आणि तिचा 21 वर्षांचा मुलगा अरहान खानमध्ये कसं नातं आहे याविषयी काही गोष्टी सांगितल्या. त्यावेळी बोलताना मलायकानं सांगितलं की तिच्या मुलाचे मित्र त्याला विचारतात की तुझी आई दैनंदिन दिवसांच्या गरजांसाठी काय काम करते? तिचा सगळा खर्च कसा सांभाळते. त्यावर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं योग्य उत्तर नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हार्पर बाजार'ला दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं या विषयी सांगितलं आहे. मलायका म्हणाली, 'एक दिवस माझ्या मुलानं मला विचारलं की त्याच्या मित्रांना कन्फ्युजन आहे की त्याची आई नक्की काय काम करते. ते म्हणाले की... तिनं चित्रपट केले, गाण्यांमध्ये काम केलं. ती एक VJ होती. तिनं मॉडेलिंग केलं आहे. छोट्या पडद्यावर देखील आली आहे. पण हे सगळं सुद्धा एका मुलासाठी खूप गुंतागुंतीचं आहे. ते गोंधळतात. जसं की ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे की मलायका ही एक टॅलेन्टेड व्यक्ती आहे. तिनं अभिनय केला आहे. टीव्ही शोमध्ये ती परिक्षक राहिली आणि त्यांचं सुत्रसंचालन देखील केलं आहे. ती डान्सर आणि मॉडल आहे.'



मलायकानं सांगितलं की 'पण मला जे करायचं आहे, त्यासाठी मला मजबूर का व्हावं लागतं? मी तर तेच करते ज्यात मला आनंद मिळतो.' 


काही महिन्यांमध्ये मलायका ही 50 वर्षांची होणार आहे. तरी देखील तिची सुंदरता ही कोणत्याही तरुणीला लाजवेल अशी आहे. दरम्यान, यावर देखील मलायकानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. मलायका म्हणाली, 'जेव्हा कोणी बोलतं की तू वयाच्या 48 व्या वर्षी देखील सुंदर दिसते. ही स्तुती आहे. हे ऐकायला पण खूप चांगलं वाटतं. 48 वर्षांमध्ये देखील जर ती अशी दिसते तर त्यामागे तिनं घेतलेली मेहनत आहे. डेडिकेश आणि फोकसमुळे जेव्हा कोणी काही विचारतं की तू असं दिसण्यासाठी काय करते तर चांगलं वाटतं.'


हेही वाचा : नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...


मलायका ही सोशल मीडियावर असलेली लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. पण नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे तिला ट्रोल करण्यात येतं. तिनं सांगितलं की 'कधी-कधी जेव्हा मला माझ्याविषयी काही वाईट लिहिलेलं दिसतं, तर त्यामुळे आता माझा दिवस खराब जाणार असं मला नेहमी वाटायचं. पण या सगळ्याला आता मी खूप चांगल्या प्रकारे हाताळायला शिकले आहे. मी स्वत: ला तसंच ठेवण्यासाठी खूप मेहनत करते. स्वत: ला मानसिकरित्या स्ट्रॉंग ठेवण्यासाठी मी योगा आणि मेडिटेशन करते. योग्य आहार घेते आणि वेळेवर झोपते.'