मुंबई : सगळ्यांना हे तर माहितच आहे की, अरबाज खान सोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा ही अर्जुन कपूरला डेट करु लागली. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या जोडप्यांमध्ये गणना केली जाते. सोशल मीडियावर देखील चाहते, यांना पसंत करतात. दोघांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी तसेच पार्टीमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. आपल्याला हे माहित आहे की अर्जुन आणि मलायका या दोघांच्या वयात खुप जास्त अंतर आहे. एवढंच काय तर मलायका अर्जुनपेक्षा वयाने मोठी आहे. ज्यामुळे अनेकदा ही जोडी नेटीझन्सकडून ट्रोल देखील झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, काही काळापूर्वी दोघांनीही दोघांच्या वयातील अंतरावर भाष्य करणाऱ्या ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिले होते. दोघांनी सांगितले की, त्यांना कोणाचीही पर्वा नाही.


परंतु आता घे जोडपं वेगळं झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.


बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांपासून मलायका घरातून बाहेर पडलेली नाही. ती पूर्णपणे एकांतात गेली आहे. मलायका खूप दुःखी आहे आणि तिला काही काळ जगापासून दूर राहायचे आहे, असे बोलले जात आहे.


याचबरोबर अर्जुन कपूरही गेल्या काही दिवसांपासून मलायकाला भेटायला गेलेला नाही. तीन दिवसांपूर्वी अर्जुन कपूर त्याची बहीण रिया कपूरच्या घरी गेला होता, जिथे डिनर ठेवण्यात आले होते. रिया मलायकाच्या घराजवळ राहते, तरीही अर्जुन तिला भेटायला गेला नाही. एवढंच काय तर मलायकाही नेहमीच अर्जुनसोबत अशा फॅमिली डिनरमध्ये सामील होते, पण यावेळी तसे झाले नाही.


त्या दिवशी अर्जुन रिया कपूरच्या घरातून थेट त्याच्या घरी परत आला. अर्जुन आणि मलायका अनेकदा कॉफी आणि डिनर डेटवर जातानाही दिसले होते, पण दोघांनीही काही काळापासून हे करणं टाळले आहे. या सर्व गोष्टींवरून असे दिसून येते की दोघांमध्ये काही चांगले चालले नाही.