COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Malaika Arora And Arjun Kapoor :  बॉलिवूडमधील (Bollywood) लव्ह बर्डची (Love Bird) सध्या सोशल मीडियावर (Social media) तुफान चर्चा सुरु आहे. अभिनेत्री मलायका अरोडा (Malaika Arora ) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor ) यांच्याच प्रेमाची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवडूमधील गॉर्जियस डीवा आणि बोल्ड अशी मलायका हिचा आज वाढदिवस (Birthday). मलायका 49 वर्षांची झाली आहे. पण अजूनही तिच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही, इतकी ती तरुण दिसते. तिच्या फिटनेसचा राज म्हणजे ती नियमित जिम करते. 


मलायका आणि अर्जुन या दोघांनी आपलं प्रेम अनेक वेळा सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.  मग आज मलायकाचा वाढदिवस...अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.  (malaika arora  birthday and arjun kapoor Instagram wishes romantic nmp )



'कायम माझी राहा...' 


द यिन टू माय यांग..हॅप्पी बर्थडे बेबी. तु जशी आहे तशी राहा. खूश राहा. कायम माझी राहा..अर्जुनने इंस्टाग्रामवर मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत. या मेसेजला मलायकाने एवढंच सुंदर उत्तर दिलं आहे.  हा फोटो मिरर सेल्फी आहे ज्यामध्ये मलायका बेज ब्लाउज आणि ब्लेझरमध्ये दिसते आहे.  तर आरशात बघत अर्जुन तिच्या मागे काळ्या पोशाखात उभा आहे. 



'फक्त तुझी'


मलायकाने अर्जुनच्या पोस्टवर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलं आहे की, 'फक्त तुझी'