Malaika Arora Birthday Bash: आपल्या अभिनयानं आणि ग्लॅमरनं प्रेक्षकांना कायम घायाळ करणाऱ्या मलायका अरोराचा (Malaika Arora Birthday) आज वाढदिवस आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्तानं अर्जून कपूरनंही खास पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. मलायकाचा आजही तितकीच हॉट आणि लोकप्रिय आहे. सगळ्या अभिनेत्रींमध्ये मलायका अरोरा सर्वात टॉप अभिनेत्री आहे. मलायका आपल्या पर्सनल लाईफसाठी आणि फिटनेससाठी कायमच चर्चेत असते. सध्या मलायका अर्जून कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत आहे. (malaika arora birthday bash kareena kapoor saif ali khan karishma kapoor spotted)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाच्या वाढदिवसानिमित्त तिनं तिच्या मित्रांना आणि कुटुंबियांना वांद्रे येथील रेस्टॉरंटमध्ये आमंत्रित केले होते. (Celebrity Spotted) मलायका नेहमीच तिच्या जवळच्या मित्रांसह प्रत्येक लहानसहान समारंभ साजरे करताना दिसते. करीना कपूर, करिश्मा कपूर आणि मलायकाची बहीण अमृता अरोरा (Malaika Arora Sister) या मलायकाच्या तीन चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या कायम एकत्र असतात. करीना, करिश्मा, सैफ अली खान, सुझैन खान आणि गुरू रंधवा यांसारख्या सेलिब्रिटींनी मलायकाच्या बर्थडे बॅशला हजेरी लावली होती. 


हेही वाचा - तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



खास मैत्रीणीच्या 50 व्या वाढदिवसाला करीना कपूरची हजेरी - करीना कपूर नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. पार्टीसाठी तिनं काळ्या रंगाची ब्रा घातली आणि काळ्या ओव्हरसाइज ब्लेझरने लेयर त्यावर घातलं होतं. तसेच निळ्या डेनिमच्या तिनं काळ्या स्लिंग बॅगने तिचा ऍक्सेसरीझ लूक पुर्ण केला.


 


हेही वाचा - 'मी कोणाला पैसे...', लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा


कुठे होतं लोकेशन? - मलायकाने तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विराट कोहलीच्या (Virat Kohli) आलिशान रेस्टॉरंट चेन One8 Commune ही जागा निवडली होती. करिश्मा मेव्हणा सैफ अली खानसोबत एकत्र स्पॉट झाली. सैफ आणि करिश्मानंही हटके फॅशन केली होती. सुझैन खान आणि अर्सलान गोनी यांनी मलायकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. यावेळी दोघेही कॅज्यूअल वेअरमध्ये दिसले. गुरु रंधवा आणि आकांशा रंजन कपूर एकत्र पार्टीत पोहचले होते. 


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मलायका अरोराने 'कांटे' आणि 'ईएमआय' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ती तिच्या नृत्याविष्कारासाठीही ओळखली जाते