Malaika Arora  - Arjun Kapoor : 'अर्जुन कपूर माझ्यापेक्षा लहान आहे आणि मी त्याला डेट करत आहे. मी त्याचं आयुष्य उध्वस्त करत आहे... बरोबर ना मी त्याचं आयुष्य उध्वस्त करत आहे?' कायम अभिनेता अर्जुन कपूरसोबत (arjun Kapoor) असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) चर्चेत असते. घटस्फोटानंतर मलायकाला अर्जुनची साथ मिळाली. महत्त्वाचं म्हणजे दोघांनी सर्वांसमोर नात्याची कबुली दिली. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता दोघांनी फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. (Malaika Arora  - Arjun Kapoor)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन आणि मलायकाच्या नात्याला अनेकांनी विरोध केला. एवढंच नाही, दोघांमध्ये असलेलं वयाचा अंतर देखील चर्चेचा विषय ठरला. पण मलायकाने 'मूव्हिंग इन विथ मलायका' शोमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने अर्जुनसोबत असलेल्या नात्याबद्दल याठिकाणी मोठं वक्तव्य केलं. (malaika arora pregnant with arjun kapoor)


अर्जुनसोबत असेलल्या नात्यावर काय म्हणाली मलायका?


'मी वयाने मोठी हेच माझं दुर्भाग्य नाही, तर कमी वयाच्या मुलाला डेट करत आहे. माझ्यात हिंमत आहे. मी त्याचं आयुष्य उध्वस्त करत आहे. बरोबर ना? मला सर्वांना सांगायचं आहे... मी त्याचं आयुष्य उध्वस्त करत नाही. असं नाही की तो शाळेत जात आहे. चांगलं-वाईट त्याला निवडता येत नाही.' (malaika arora-arjun kapoor relationship)



'मी त्याला डेट करत असल्यामुळे त्याचा अभ्यास होत नाही. जेव्हा आम्ही बाहेर भेटायला जातो, तेव्हा त्याला लेक्चर बंक करावे लागत आहेत.. तो पोकेमॉन पकडत असताना मी त्याच्या मागे मागे जाते...असंही काही नाही..' असं देखील मलायका म्हणाली. (malaika arora-arjun kapoor wedding)


वाचा |  पुढच्या वर्षी Sidharth-Kiara अडकणार विवाहबंधनात? पाहुण्यांची यादी समोर


 


पुढे मलायका म्हणाली, 'सुदैवाने तो मोठा झाला आहे आणि मर्द आहे. आम्ही दोघे समजदार आहोत. जर पुरुष लहान वयाच्या मुलीला डेट करत असेल तर तो प्लेयर आणि जर एखादी महिला लहान वयाच्या मुलाला डेट करत असेल तर ती (Cougar) कुगर ? हे बिलकूल बरोबर नाही.' असं मलायका म्हणाली. Malaika Arora  break silence on relationship with arjun Kapoor at Moving In With Malaika