Malaika Arora Daance On Bar Counter Got Trolled : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या मलायका तिचा शो 'मूव्हिंग इन विथ मलायका'मुळे (Moving In With Malaika) चर्चेत आहे. या शोमध्ये फ्री ड्रिंक्स मिळवण्यासाठी मलायका बार काऊंटरच्या टेबरवर चढून डान्स करते. यामुळे मलायका सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोक तिला ट्रोल करत आता काही काम नाही तर खासगी आयुष्यातील गोष्टी आणि घरातील भांडण सगळ्यांना दाखवत पैसे कमावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मूव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) शोची  एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका एका रेस्टॉरंटच्या बार काऊंटरच्या टेबलवर चढून डान्स करताना दिसते. मलायकाचा हा डान्स अनेक नेटकऱ्यांना आवडला आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. (Malaika Arora Trolled Over Dance On Table) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायकाने शोमध्ये सांगताना दिसते की तिची धाकटी  बहिण अमृता अरोरा (Amrita Arora) ही तिच्यावर रागावली आहे. तर अमृता त्या काळात गोव्याला गेली असल्यामुळे तिची  समजूत काढण्यासाठी मलायका गोव्याला जाते. त्यानंतर मलायका आणि अमृता दोघेही जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये जातात. यावेळी जुने दिवस आठवत अमृता मलायकाला सांगते की तू तुझ्या स्टाईल आणि ग्लॅमरचे प्रदर्शन करत आपल्याला फ्री ड्रिंक्स मिळवून दाखव. दरम्यान, मलायका हे चॅलेन्ज स्विकारते आणि बारच्या मालकाशी या विषयी बोलते. 


हेही वाचा : "तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या...", Rishabh Pant च्या Car Accident नंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट व्हायरल


मलायका बार मालकाला म्हणते, मी माझी पर्स विसरले आहे आणि आम्हाला ही जागा प्रचंड आवडली आहे, तर तुम्ही आम्हाला... यावर लगेच बोलत तो बार मालक म्हणतो की खरंच विसरलीस की काही गडबड आहे. तर मलायका त्याला उत्तर देत बोलते की ती खरचं तिची पर्स विसरली आहे. यावर बार मालक बोलतो की ठीक आहे पण माझी एक अट आहे, त्या बदल्यात तुला जे ड्रिंक्स पाहिजे ते मिळतील की या बदल्यात मला काय  मिळेल असा प्रश्न तो करतो. इतक्यात अमृता त्याला सांगते की मलायका इथे सगळ्यांसमोर बार काऊंटरच्या टेबलवर डान्स करून दाखवेल आणि मलायका डान्स करून दाखवते. 


मलायकाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. इतकेच काय तर कोणत्या गोष्टी करायच्या हे देखील तिला कळत नाही. याशिवाय तिच्या अशा करण्यामुळे इतरांवर याचा काय परिणाम होतो हे तिला कळायला हवं असे काही लोकांचे म्हणणे आहे.