Video Viral : डिनरवरून घरी परतताना मलायकासोबत घडली दुर्घटना; तोल गेला, पाय घसरला आणि ...
मलायका अरोरा डिनरला गेली असता तिच्यासोबत मोठी दुर्घटना घडली. यावेळी मलायकाचा तोल जाता जाता सावरला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मलायका आपल्या मित्रांसोबत डिनरला बाहेर गेली होती. यावेळी तिच्यासोबत अर्जून कपूर नसून इतर मित्र दिसले. तेव्हा मलायकाचा पाय घसरा आणि तोल जाता जाता सावरला. मलायकासोबत घडलेल्या या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मलायकाचा व्हिडीओ
मलायका अरोरा रेस्टॉरंटमधून बाहेर जाताना तिला ठेच लागली. पण यावेळी लगेच तिचा मित्र तिला सावरण्यासाठी पुढे सरसावला. पण मलायकाचा हा व्हिडीओ बघून चाहते खूप वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. मलायकाला का तिचा तोल सावरता येत नाही? आता ती म्हातारी झाली का? अशा देखील कमेंट यापोस्टमध्ये दिसत आहेत.
मलायकाचा लूक
मलायका कायमच स्टनिंग लूकमध्ये दिसते. यावेळी मलायका सिंपल मात्र स्टायलिश लूकमध्ये देखील अतिशय सुंदर दिसत आहे. मलायकाने यावेळी खाकी पँट सोबत व्हाइट क्रॉप टॉप कॅरी केला आहे. तसेच यावेळी मलायकाचे केस आणि मेकअप अतिशय मिनिमल ठेवलं आहे. यावेळी तिने आपला लूक पूर्ण करण्यासाठी एक स्टेटमेंट बॅग कॅरी केल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मलायकाची पोस्ट
दरम्यान, मलायकाने इंस्टाग्रामवर 'बेस्ट डॉक्टर्स'साठी तिच्या शिफारसी शेअर केल्या आहेत. मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात लिहिले आहे, "सात सर्वोत्तम डॉक्टर: सूर्यप्रकाश, पाणी, निरोगी अन्न, विश्रांती, हवा, हसणे, व्यायाम." याआधी, तिने तिचे 'नोव्हेंबर चॅलेंज' शेअर केले होते ज्यात अल्कोहोल आणि काही विशिष्ट लोकांचा समावेश आहे.
मात्र, सिंघम अगेनच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान अर्जुन कपूरने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगितले होते की, तो आता सिंगल आहे. या कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो गर्दीला सांगत होता, "मी सध्या अविवाहित आहे, आराम करा." मलायका आणि अर्जुन दोघांनीही यापूर्वी त्यांच्या ब्रेकअपबद्दल जाहीरपणे बोलले नव्हते, तरीही त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा अनेक महिन्यांपासून पसरत होत्या.