अर्जुन कपूरची कोणती गोष्ट पाहून Malaika Arora पडली प्रेमात, स्वत:चं केलं रिवील
Malaika Arora Arjun Kapoor : अलीकडेच ती पुन्हा एकदा अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे.
मुंबई : बॉलिवूडची स्टाईल आयकॉन मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच ती पुन्हा एकदा अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे.
सध्या सगळीकडेच मलायका आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपची चर्चा रंगते आहे. मलायका आणि अर्जुन कपूर यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. असं असताना मलायका या गोष्टीबद्दल काही बोलण्यापूर्वीच अर्जुन कपूरने या वृत्तांचे जोरदार खंडन केले.
मलायकासोबतचा एक सेल्फी शेअर करत त्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, त्याच्या आयुष्यात फालतू अफवांना जागा नाही. दोन्ही लव्ह बर्ड्स एकमेकांशी खूप मजबूत बाँडिंग शेअर करतात, म्हणूनच ब्रेकअपच्या बातमीवर त्यांची प्रतिक्रिया द्यायला वेळ लागला नाही. तसे, केवळ अर्जुनच नाही तर मलायकाही तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरवर जीव ओवाळून टाकते.
एका मुलाखतीत मलायकाला जेव्हा अर्जुन कपूरबद्दल सर्वात जास्त काय आवडते असे विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, अर्जुन तिला आतून बाहेरून प्रत्येक प्रकारे चांगले ओळखतो, तिला हसवतो, आनंदी ठेवतो. मलायकाला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते.
त्यांच्या नात्याला जवळपास चार वर्षे उलटून गेली आहेत. अनेकवेळा त्यांच्या लग्नाची चर्चा रंगते, पण या वृत्तांवर दोघांनीही सांगितले होते की, जेव्हा ते लग्न करतील तेव्हा नक्कीच सर्वांना सांगतील.