मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात झाला. या अपघातात अभिनेत्री जखमी देखील झाली. मलायकाच्या अपघाताची बातमी कळताचं अभिनेता अर्जुन कपूर तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मलायकाच्या घरी पोहोचला. मलायकाच्या कठीण समयी अर्जुन तिच्यासोबतचं होता. अपघातानंतर अखेर मलायका सर्वांसमोर आली आहे. मलायकाने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांची चिंता दूर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका आता पूर्णपणे ठिक झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्टोरी शेअर केली आहे. फोटोमध्ये मलायका पहिल्यासारखी सुंदर दिसत आहे. पण तिच्या चेहऱ्यावर जखमेची खूण अद्यापही दिसत आहे. 



फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'हीलिंग' असं लिहिलं आहे. याचा अर्थ तिची प्रकृती आता स्थिर आहे. अपघातानंतर मलायकाने पहिल्यांदा फोटो पोस्ट केला आहे. अपघातात मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाली होती. 


मलायकाच्या डोळ्याला दुखापत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि त्याची कार इतर तीन कारला धडकली. मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. अपघातानंतर लगेचच तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


एका वृत्तानुसार, मलाइकाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं आहे. मलायकाच्या कारची ज्या इतर तीन गाड्यांशी टक्कर झाली आहे. त्या त्याच कार्यकर्त्यांच्या असल्याचंही वृत्त आहे जे राज ठाकरेंच्या सभेला पुण्याहून मुंबईला जात होते.