बाथरुममधून बाहेर आली पण... मलायकाने शेअर केला हा किस्सा
मलायकाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा तिच्या फिटनेमुळे चर्चेत असते. मलायकाच्या फोटोंचे चाहते दिवाने आहेत. मलायकाच्या फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मलायकाच्या डान्सचीही चर्चा सोशल मीडियावर होत असते. नुकतीच मलायकाने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि गंमतीशीर गोष्ट सांगितली आहे. मलायकाने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर मजेदार किस्सा शेअर केला आहे. कोरोनाची लस घेवून घरी आलेल्या कुटुंबीयांना ती काय बोलते हे मलायकाने सांगितले आहे.
नुकताच मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, ''जेव्हा यापूर्वी माझ्या घरी पाहुणे यायचे तेव्हा ती नेहमी म्हणायचे, "घाबरू नको, मी माझ्या कुत्र्यांना लस दिली आहे." आता मी कुत्र्यांना सांगते, घाबरू नका, आम्ही लस घेतली आहे.
मलायका पँट घालायचीच विसरली
इतकेच नाही तर, मलायकाने कोरोना कालावधीतला एक किस्सादेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. मलायकाने लिहिले आहे की, जेव्हा मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेले, तेव्हा मी कोपऱ्याच्या सहाय्याने दरवाजा उघडला. मी पायाने टॉयलेट सीट उघडली, मी टिशूच्या मदतीने पाण्याचा वापर केला, हात धुतले आणि मग बाथरूमचा दरवाजा कोपऱ्यांनी बंद केला, पण जेव्हा मी टेबलकडे परतले, तेव्हा मी माझी पँट चढवायला विसरली होती. मलायकाची ही मजेशीर स्टोरी पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मलायकाची कोविड १९चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मलायका काही दिवसांपूर्वी मैत्रीण करीना कपूर खानच्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी मलायकाने तिच्या आणि अरबाच्या घटस्फोटाविषयी सांगितलं, ''आम्हाला हा निर्णय घेणं सोप न्हवतं. कुणा एकावर आरोप हा लागणारच होता. सगळेच जण दुसर्यांच्या विरोधात बोलतात.''
मलायकाने सांगितले होते की, ती तिच्या विवाहित जीवनान आनंदी नसल्याने तिनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ''आम्ही बर्याच गोष्टींबद्दल विचार केला आणि त्यानंतर आम्ही हे ठरविले की जबरदस्तीने या नात्याचा पुढे ढकलण्यापेक्षा आपण वेगळे झालं पाहिजे''