Malaika Arora Rented Her one of Luxury Apartment : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हे घटस्फोटानंतर देखील आलिशान आयुष्याचा आनंद घेताना दिसते. मलायका तिच्या घरी तिच्या मुलासोबत राहते. पण जास्त वेळ ती ती एकटी असते. या सगळ्यात मलायकानं तिचं वांद्र परिसरात असलेलं घर हे भाड्यावर दिलं आहे. रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरानं वांद्रे पश्चिमध्ये असलेलं तिचं हे घर कॉस्ट्यूम डिझायनर कशिश हंसला तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जैपकी' कडून मिळालेल्या माहितीनुसार, असं समोर आलं आहे की मलायका अरोरानं मुंबईत असलेल्या वांद्रे परिसरातील तिचं घर हे भाडेतत्वावर दिलं आहे. कॉस्ट्यूम डिझायनर कशिश हंस तीन वर्षांसाठी 1.57 लाख असं दर महिन्याला भाडं देणार आहे. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, वांद्रे पश्चिमच्या पाली हिलमध्ये असलेल्या अपार्टमेंटसाठी करण्यात आलेल्या या करारानुसार दर वर्षी हे भाडं 5 टक्क्यांनी वाढेल.



रिपोर्ट्सनुसार, तीन वर्षांसाठी असलेल्या या भाड्याची माहिती ही पुढे दिल्या प्रमाणे आहे. पहिल्या वर्षभरासाठी हे भाडं दर महिन्याला 1.5 लाख रुपये. दुसऱ्या वर्षी दर महिन्याला हे भाडं 1.57 लाख होणार. तर तिसऱ्या वर्षी हे भाडं 1.65 लाख रुपये होणार. तर भाड्यावर देण्याविषयी आणि पुढच्या तीन वर्षांच्या या भाड्याविषयीच्या या सगळ्या गोष्टीचं रजिस्ट्रेशन हे 29 एप्रिल 2024 रोजी करण्यात आलं आहे. याशिवाय भाडेकरुनं 4.5 लाख रुपये डिपॉझिट म्हणून जमा केले आहेत, अशी माहिती कागदोपत्री असल्याचं म्हटलं आहे.


हेही वाचा : 'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती


दरम्यान, मलायकाची ही पहिली प्रॉपर्टी नाही. 'जैपकी' च्या रिपोर्टनुसार, याआधी तिनं वांद्रेतील अपार्टमेंट जेफ गोल्डनबर्ग स्टूडियोचे मालक असलेल्या जेफरी गोल्डनबर्गला 1.2 लाख रुपये दर महिन्याला भाडेतत्वावर दिली आहे. मलायकानं बॉयफ्रेंड अर्जुन कपूरनं 2022 मध्ये वांद्रे पश्चिमेला असलेल्या 81 ऑरेट बिल्डिंगमध्ये असलेलं एक अपार्टमेंट तब्बल 16 कोटींना विकलं आहे. हा फ्लॅट 19 व्या मजल्यावर असून हा 4364 स्क्वेअर फूटचा आहे. या घरात सगळ्या सुख-सुविधा असून लॅविश आहे. मलायका ही तब्बल 98.98 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे.