मुंबई : बॉलिवूड अभिनेता मलायका अरोराचे काही फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. मलायकाने स्वतःचे काही  फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये मलायकाने पर्पल रंगाचा ड्रेस घातला आहे. मलाकाच्या पर्पल ड्रेसने चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकवला आहे. सर्वत्र मलायकाच्या 'हॉटशॉट' फोटोंची जादू पसरली आहे. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यांनी कमेन्ट सेक्शनमध्ये मलायकाचं भरभरून कौतुक केलं आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर फायर आणि हार्टचे इमोजी पाठवले आहेत. मलायकाच्या कामा व्यतिरिक्त तिच्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असते. मलायका आणि अर्जुन यांचं नातं पाहता प्रेम करण्यासाठी वयाची किंवा इतर कशाचीच मर्यादा नसते हेच स्पष्ट होत आहे.


गेल्या काही दिवसांपासून मलाइका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्या सारख्या पसरत आहेत.दिग्दर्शक करण जोहरने दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले. त्यानंतर चाहते मलायका आणि अर्जुनला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारत आहेत.  दोघांनी नात्याची कबुली दिली असली तरी लग्न कधी करणार याबद्दल काही सांगितलं नाही.