Malaika Arora Zee Marathi Awards: अभिनेत्री मलायका अरोराची सोशल मीडियावर जोरात चर्चा ही रंगलेली असते. नुकताच तिनं आपला 48 वा वाढदिवस साजरा केला आहे. झी मराठी अवॉर्ड 2023 हा सोहळा पार पडला आहे. यावेळी माधुरी दीक्षित आणि मलायका अरोरा यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे मराठी चाहत्यांचे लक्षही त्यांच्याकडे वळले होते. यावेळी तिनं सुंदर असा साजशृंगार केला होता. तिनं चंदेरी रंगाची सुरेख अशी साडी परिधान केली होती. त्याचसोबत तिनं दागिन्यांचाही शृंगार केला होता. यावेळी तिची जोरात चर्चा रंगलेली होती. सोबतच माधुरी दीक्षितच्याही स्टाईल आणि फॅशनचेही सर्वांनी कौतुक केले होते. यावेळी मलायका अरोरानं या कार्यक्रमात आपल्या नृत्यानं उपस्थितांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आपल्याला माहितीच आहे की मलायका अरोरा ही किती सुंदर डान्सर आहे. यावेळी तिच्या या नृत्यानं चारचांद लावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोबतच आपल्या पाककौशल्यानंही तिनं उपस्थितांची मनं जिंकून घेतली आहेत. यावेळी तिनं बेसनाचे लाडू बनवायचा प्रयत्न केला. त्यात तिला बऱ्यापैंकी यश मिळाले आहे. झी मराठीनं सोशल मीडियावरील आपल्या ऑफिशियल अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. यावेळी तिनं आपल्या नृत्यानं उपस्थितांची मनं जिंकली आहेत. सोबतच मराठी आणि हिंदी गाण्यांवर यावेळी तिनं नृत्य केले. तिचा मराठमोळा अंदाज पाहून तर प्रेक्षकही खूप खुश झाले होते. यावेळी तिनं श्रेया बुगडेसोबत एक खेळही खेळला होता. ज्यात तिनं आपलं पाककला कौशल्य दाखवले आहे. यावेळी ती बेसनाचे लाडू करत होती. 


हेही वाचा : कार्तिकी गायकवाडनं विकत घेतली महागडी कार; किंमत माहितीये का?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावेळी सलील कुलकर्णी यांच्याकडे पाहून ती म्हणते की, ''फक्त लड्डू देणार, पण मी नाही येणार हं.'' सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची कायमच चर्चा रंगलेली असते. यावेळीही तिचीच चर्चा आहे. आपल्या जीम लुकनं ती प्रत्येकाला घायाळ करताना दिसते. यावेळी तिनं आपला सगळा वेस्टर्न लुक हा बाजूला ठेवला होता आणि तिनं सुंदर अशा साडीत आपला साजशृंगार केला होता. तिच्या या घायाळ करणाऱ्या लुकची चर्चा होती.