कार्तिकी गायकवाडनं विकत घेतली महागडी कार; किंमत माहितीये का?

Kartiki Gaikwad: कार्तिकी गायकवाड हिनं नवी गाडी खरेदी केली आहे. सध्या तिनं आपल्या या नव्या गाडीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. तुम्ही तिची नवी गाडी पाहिलीत का? 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 26, 2023, 05:48 PM IST
कार्तिकी गायकवाडनं विकत घेतली महागडी कार; किंमत माहितीये का? title=
kariki gaikwad buys new car kia seltos video viral

Kartiki Gaikwad: मराठी कलाकारही आता महागड्या गाड्या आणि आलिशान घर घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका लोकप्रिय गायिकेनं आपल्या नव्या गाडीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्समधील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड हिनं नवी कार विकत घेतली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून ती आपले नवनवीन फोटो आणि अपडेट्स हे पोस्ट करताना दिसते. यावेळी तिनं आपल्याला अकांऊटवरून आपल्या नव्या गाडीचा फोटो हा पोस्ट केला आहे.

यावेळी तिनं आपल्या नवऱ्यासोबत ही गाडी खरेदी केली होती. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधून कार्तिकी घराघरात पोहचली होती. या पर्वाची ती विजेतीही होती. गेली 15 वर्षे आता ती व्यावसायिक मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली असते. दोन वर्षांपुर्वी तिचे लग्न झाले होते सोबतच तिच्या हनिमूनचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे आपल्या गायनासोबतच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखली जाते. 

कार्तिकी आणि रोनित पिसे यांचे लग्न झाले असून यावेळी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी गाडी घेतली आहे. यावेळी त्यांच्या घरात नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. हा सदस्य आहे हीच नवी कार. सध्या आपल्याकडे एक नवी कार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी आपण कार लोन घेतो आणि त्यासाठी बरेच प्रयत्न करतो. शेवटी आपलं ते स्वप्नही पुर्ण होतं आणि आपल्या घरात या नव्या गाडीसाठी हक्काची जागा येतेच येते. गाडीमुळे आपल्या घराची शोभाही वाढते. त्यातून आपल्या स्टेटसही वाढते. यावेळी कार्तिकीनं खरेदी केलेली ही गाडी लाल रंगाची आहे. किया सेलटोझ कंपनीची ही गाडी आहे. 

हेही वाचा : 'आम्ही इतके हरवलो होतो की खालून दगड...', रामलीलामधील किसिंग सीनवर पहिल्यांदाच बोलला रणवीर

यावेळी तिनं गाडी खरेदी करण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी तिनं या गाडीची पूजाही केली आहे. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर यावेळी स्मितहास्य होते. परिवारात सुखाचा क्षण आल्याचा आनंद, उत्साह होता. यावेळी रोनित गाडीच्या कागदपत्रांवर सही करतो आणि सोबतच शोरूममधील असिस्टंट्स त्यांच्या ताब्यात कार देतात. यावेळी कार्तिकीच्या या व्हिडीओनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''ताफ्यात आणखी एकीचा समावेश…'' असं कॅप्शन त्या दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून दिले आहेत. सध्या त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी नानाविध कमेंंट्सही केल्या आहेत. यावेळी चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.