मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या अभिनेत्रीच्या अपघातानंतर चाहत्यांची चिंता वाढली होती. मात्र, आता मलाइकाची ही अवस्था पाहून तिच्या चाहत्यांना सुटकेचा नि:श्वास सोडता येणार आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या फोटोंमध्ये मलायका अरोरा शेफच्या भूमिकेत दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री स्वयंपाक करताना दिसत आहे.  नुकतीच मलायका तिच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती, तिथून तिची ग्लॅमरस झलक पाहायला मिळाली. यादरम्यान अभिनेत्रीने ऑफ शोल्डर व्हाइट ड्रेस परिधान केला होता. त्यासोबत तिने ब्राउन स्कर्ट कॅरी केला आहे. तिची ही स्टाइल सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला फोटो शेफच्या अवतारातला आहे त्यामुळे अनेकजण तिला करिअर बदलंलं का असा प्रश्न विचारत आहेत.



नुकत्याच झालेल्या अपघातात मलायकाला गंभीर दुखापत झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता ती पूर्णपणे ठिक झाली आहे. अपघातानंतर मलायकाही आपल्या कामावर परतली आहे. नुकतीच एका पोस्टद्वारे ही माहिती तिने दिली. ज्यामध्ये ती लेग्स फ्लॉन्ट करत आहे.