मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकमुळे आणि अभिनेता अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर 48 वर्षीय मलायका अरोरा तिच्या वयापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका सोशल मीडियावर अर्जुनसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असते. आता देखील तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे मलायका तुफान चर्चेत येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'याठिकाणी खरी गर्मी आहे...' असं लिहिलं आहे. तिने अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केला होता. ज्यामुळे मलायका सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. 


मलायकाच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत राहिली आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर  त्यांच्या नात्यामुळे बर्‍याच काळापासून चर्चेत आहेत.