मुंबई : गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्यानं कायमच चर्चां रंगल्या. एकमेकांसोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून सुट्टीसाठी निवांत ठिकाणी जाण्यापर्यंत या दोघांची एकमेकांना साथ असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री मलायका तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर उत्साही वातावरण निर्माण करते. मलायका अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही सोशल मिडियावर चर्चेत असते. लोक त्यांच्या वयाच्या अंतराबद्दल अनेकदा दोघांना ट्रोल करतात. मात्र या बिंधास्त मलायकाला काहीच फरक पडत नाही.


एकदा एका शोमध्ये  तिला शारीरिक संबंध ठेवताना कोणती पोझिशन पसंत आहे. असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावरमलायका म्हणाली, 'मला अशावेळी वरती रहायला आवडतं.' तिच्या या उत्तरानंतर दोघही एकमेकांकडे बघून हसू लागले.  


अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा 2016 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहेत ज्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुनच्या लग्नाबाबत अनेक अपडेटही समोर येत असतात.  


मलायका अरोरा आणि अरबाज यांच्या घटस्फोटानंतर तिची अर्जुन कपूरसोबतची जवळीक वाढू लागली. अनेक वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे बंध आणखी घट्ट झाले आहेत. मलायका अरोराने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये अनेक खोडकर प्रश्नांची उत्तरं दिली. मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही बोलली. घटस्फोटानंतर ती कशी पुढे गेली हे देखील तिने सांगितलं. यावेळी नेहाने मलाइकाला विचारले की तिला कशाप्रकारची मुलं आवडतात. यावर मलायका म्हणाली की, ''मला बियर्ड असणारी मुलं आवडतात ज्यांचा सेंस ऑफ ह्यूमर चांगला आहे.