मुंबई : कोरोनामुळे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील काम बऱ्याच अंशी बंद आहेत. त्यामुळे मोठ-मोठे कलाकार हे घरी बसून आहेत . काही सिनेमांचे शुटींग हे कोरोनाच्या निर्बंधांमुळे अडकून पडलं आहे. त्यामुळे सेलिब्रिटी देखील आपली इतर घरची काम कऱण्यासाठी स्वत: करताना दिसतायेत. अगदी घरची साफसफाई करण्यापासून ते मार्केटमध्ये जाऊन भाजी आणण्यापर्यंतची सगळी काम करण्यासाठी हे स्टार बाहेर पडताना पाहायला मिळतायेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमध्ये देखील कलाकारांनी आत्मनिर्भर बनत स्वत: घरच्या कामांमध्ये आपल्या फॅमिलीला मदत केली, काहींनी तर घरच्या गार्डनमध्ये फुल, फळ आणि भाज्यांची लागवड देखील केली.



बॉलिवूडची बोल्ड मुन्नी मलायका अरोराने देखील लॉकडाऊनच्या काळात मुलाला आपल्या हाताने बनलेले खास पदार्थ खायला घातले. अद्याप कलाकार स्वत:ची काम करण्यासाठी बाहेर पडताना दिसतायेत. त्यात नुकतीच मलायका घरच्या कपड्यांवरच रस्त्यावर फिरताना दिसून आली. 


पेट डॉगसोबत मलायका नो मेकअप लूकमधील दिसली. यावेळी मलायकाने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस, चप्पल घातली होती. सकाळच्या वॉकसाठी मलायका घरच्याच कपड्यांमध्ये बाहेर पडली. पण यावेळी मलायका काहीशी नाराज दिसली, जणू मलायका आपल्याच विचारात रमली होती. फोटोग्राफर्सची गर्दी असताना ही मलायकाचं मात्र लक्ष नव्हतं