हेअर क्रिमची जाहिरात करणं अभिनेत्याला पडलं महागात
५ लाखाचा दंड
मुंबई : केरळमध्ये एका कंझ्युमर कोर्टाने हेअर क्रीम प्रोडक्टच्या जाहिरातीत चुकीचा दावा केल्यामुळे एका अभिनेत्याला जबाबदार ठरवलं आहे. अभिनेत्याने हेअर क्रिमबद्दल पूर्ण माहिती न घेता जाहिरात केली. या अभिनेत्याचं नाव आहे अनूप मेनन असं आहे. या प्रकरणाबाबत अभिनेत्याला दंड भरावा लागला आहे.
त्रिसूर जिल्ह्यातील ग्राहक मंचाने धात्री हेअर क्रीम (Dhathri Hair cream) बनवणारी कंपनी आणि सिने अभिनेता अनूप मेनन यांच्यावर १०-१० हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. फ्रान्सिस वडक्कन यांनी ए-वन मेडिकल्स, धात्री आयुर्वेद प्रायवेट लिमिटेड आणि अनूप मेननविरोधात २०१२ मध्ये तक्रार दाखल केली आहे.
वडक्कनने सांगितलं आहे की, हेअर क्रिमला जानेवारी २०१२ मध्ये ३७६ रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. हेअर क्रिमची जाहिरात पाहिल्यानंतर खरेदी केली. ज्यामध्ये अनूप मेननचा असा दावा आहे की, या क्रिमला ६ आठवडे वापरल्यानंतर त्याचा फरक दिसत आहे. मात्र ही क्रिम वापरल्यानंतर कोणताच फरक दिसला नाही. यानंतर वडक्कन यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. ५ लाख रुपयाची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
याप्रकरणी ग्राहक मंचाने अनूप यांना विचारले असता त्यांनी ही क्रिम कधी वापरली नसल्याचे म्हटले आहे. ‘ही क्रिम मी कधी वापरली नाही. मी केवळ माझ्या आईने बनवलेले केसांचे तेल वापरतो’ असे त्यांनी म्हटले. तसेच जाहिरातीमध्ये काय दावा करण्यात आला आहे हे देखील माहिती नसल्याचे अनूपने सांगितले आहे.