Aparna Nayar Death: दाक्षिणात्त्य अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. अभिनेत्री अपर्णा नायर यांचे वयाच्या 31 व्या वर्षी अचानक निधन झाल्याचे समोर आले आहे. यावेळी समोर आलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री काल रात्री त्यांच्या राहत्या घरीच मृत अवस्थेत आढळल्या. यावेळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांचा मृत्यू कशामुळे झाला असावा याचे मात्र ठोस कारण अजून सापडलेले नाही. अर्पणा नायर या लोकप्रिय मल्ल्याळम टिव्ही अभिनेत्री होत्या. त्यांची त्यामुळेच सर्वत्रच चर्चा रंगलेली असायची. त्यांच्या पश्चात त्यांचे पती व त्यांच्या दोन मुलीही आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, अपर्णा नायर यांचे निधन हे गुरूवारी रात्री झाले आहे. सकाळी 7.30 वाजता त्यांचा मृतदेह मिळाला आहे. त्यांचा मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची आई आणि बहीणही होत्या. त्यांचा मृतदेह सापडल्यानं त्यांना तातडीनं रूग्णालयात नेण्यात आले आहे. परंतु त्यावेळी डॉक्टरांनी मात्र त्यांना मृत घोषित केले होते. परंतु सध्या त्यांचे पोस्टमार्टम हे सुरू असून पोलिसही या प्रकरणात गांभिर्यानं लक्ष घालत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्पणा यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही-सिरियल्समध्ये कामं केली होती. त्यांनी लोकप्रिय 'मालिका मेगाथीर्थम', 'मुधुगौव', 'अचयन्स', 'कोडथी समक्षम बालन वकील', 'कल्कि', 'चंदनमाझा' आणि 'आत्मसखी' अशा लोकप्रिय मालिकांमधून कामं केली आहेत. अपर्णा या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. त्यातून ते आपले फॅमिली फोटोजही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांचे पती संजीत नायर आहेत आणि त्यांच्या दोन मुली थ्रया नायर आणि कृतिका नायरही आहेत. अर्पणा यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपुर्ण परिवार शोकाकुल आहे. यावेळी मल्ल्याळम टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतूनही त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. 


वर म्हटल्याप्रमाणे त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय होत्या. त्यांची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा असायची. यावेळी त्यांची आपली लाडक्या लेकीसाठी खास पोस्टही लिहिली होती. त्यामुळे त्यांची ही पोस्ट शेवटची पोस्ट ठरली होती. यावेळी त्यांनी आपल्या लेकीसोबतच गोड असा व्हिडीओ शेअर केला होता. त्यातून या व्हिडीओमध्ये त्या आपल्या लेकीसह फार खुशही दिसत होत्या. त्यांनी आपल्या पतीसोबतही एक फोटो शेअर केला होता ज्यात त्यांनी आपल्या पतीला Strength असं म्हटलं होते. 


आत्महत्या की...?


समोर आलेल्या माहितीनुसार असेही कळते की त्यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली असावी. त्यातून सकाळी त्यांचा मृतदेह आढळ्यानंतर त्यांना तातडीनं पीआरएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यांच्या परिवाराकडून स्टेटमेंट्सही पोलिसांनी घेतले आहेत. त