दिग्दर्शकाविरोधात लोकप्रिय अभिनेत्रीकडून अब्रूनुकसानीची तक्रार
....या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी एकत्र काम केलं आहे.
मुंबई : चित्रपट विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या दाक्षिणात्य विशेषत: मल्याळम कलाविश्वात अतीशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री मंजू वारियर हिने तिच्याच चित्रपट दिग्दर्शकाविरोधात एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. व्ही. ए. श्रीकुमार मेनन या दिग्दर्शकाविरोधात केरळच्या डीजीपी लोकनाथ बेहरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या दोघांनीही 'ओडियान' या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केलं आहे.
मेनन आपली प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप तिले केला आहे. मेनन आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहिमच चालवत आहे. इतकच नव्हे, तर तो आपल्या मित्रमंडळींनाही धमकावत आहेतअसा आरोप मंजूने केला आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत तिने रितसर लेखी तक्रार दाखल केली आहे.
'मंजू वारियर फाऊंडेशन'च्या लेटर हेडचा आणि आपली स्वाक्षरी असणाऱ्या काही कोऱ्या धनादेशांचाही मेननकडून गैरवापर केला जाऊ शकतो, असा अंदाजही तिने वर्तवला. लेखी तक्रारीसोबतच मंजूने कही डिजीटल पुरावे सादर केल्याचंही कळत आहे.
फक्त चित्रपटाच्याच निमित्ताने नव्हे, तर मंजू आणि श्रीकुमार यांनी काही जाहिरातींच्या निमित्तानेही काम केलं आहे. कल्याण ज्वेलर्सच्या बऱ्याच जाहिरातींसाठी त्यांनी एकत्र काम केलं आहे. ज्यानंतर मंजू श्रीकुमार मेनन दिग्दर्शित 'ओडियान' या चित्रपटात झळकली होती. २०१८ च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर दिग्दर्शक असणाऱ्या मेनन यांनी याचा दोष मंजूच्या माथी मारल्याचं म्हटलं जात होतं. ज्यानंतर आरोप- प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं. तेव्हा आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.