मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान हिच्या कारखाली आल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी हा अपघात झाला असून, ज्या कारने दुचाकीस्वाराला उडवलं ती अभिनेत्री झरीन खानच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर गोवा परिसरात असणाऱ्या अंजुना बीच येथे हा अपघात झाला. बुधवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात ३१ वर्षीय नितेश गोरल या तरुणाचा मृत्यू झाला आहे. 


नितेश हा मुळचा म्हापसा येथील एका गावात राहणारा असून, अपघातानंतर म्हापसा येथील असिलो रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुद्द झरीनसुद्धा त्यावेळी कारमध्ये उपस्थित होती. या आपघाताप्रकरणी आता तपास सुरु असून, त्याविषयीची सविस्तर माहिती लवकरच समोर येईल, असं अंजुना पोलीस स्थानकातील संबंधित अधिकारी म्हणाले. 


अमर उजालाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार झरीनच्या कार चालकाविरोधात अंजुना पोलीस स्थानकात बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या काळात या प्रकरणी पुढील कारवाईकडे अनेकांच्याच नजरा लागून राहिलेल्या असतील. 


झरीन ही सलमान खानसोबत 'वीर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यासोबतच तिने 'रेडी' या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तिने 'हेट स्टोरी ३', 'हाऊसफुल्ल २' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 


(सविस्त वृत्त लवकरच)