मुंबई: दरवर्षी फेमिना मिस इंडियाची सगळ्यांनाच उत्सुकता असते. यावर्षी या सोहळ्याला कोरोनाचं ग्रहण लागलं, मात्र तरीदेखील हा सोहळा ऑनलाईन पद्धतीन मोठ्या थाटाक पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या आणि बहुचर्चीत असलेल्या मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्टफेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले बुधवारी रात्री म्हणजे १० फेब्रुवारीला हा सोहळा मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये पार पडला. २०२०ची विजेती मानसा वाराणसी ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे.मिस इंडियाचे हे ५७ वे पर्व होते. फेमिना मिस इंडिया २०२०चे आयोजन  तर वाणी स्टार परफॉर्मर होती. 


मिस इंडिया ठरलेली मानसा वाराणसी ही २३ वर्षांची आहे. या आधी तिने मिस तेलंगणा हा किताब जिंकला होता. खुशी मिश्रा, मान्या सिंह, मानसा, रती हुलजी आणि मणिका शोकंद या फेमिना मिस इंडियाच्या टॉप ५ फायनलिस्ट होत्या.




अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ति खुराणा आणि पुलकित सम्राट यांनी हजेरी लावली होती. तर अपारशक्तिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते. पुलकित सम्राट आणि चित्रांगदा या फिनालेचे पॅनलिस्ट होते.